संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

अधिकारी सुस्त झाल्याने दर्यापुरात कामांचा बोजवारा

शशांक देशपांडे

दर्यापूर : नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कुचकामी ठरल्याचे चित्र दर्यापुरात दिसून येत आहे. कामांचा निपटारा वेळेत करण्याचे नियम असताना नियमांना धाब्यावर बसवून अधिकारी सुस्त झाले आहे. यामुळे साईनगर, मूर्तिजापूर रोड, मोमीनपुरा, सदानंद कॉलनी भागातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

दर्यापूर शहरातील जीवन प्राधिकरणच्या कामांची निविदा खामगाव येथील कंत्राटदाराला दिलेले आहे. मात्र अनेक ठिकाणी खोदकाम करीत थंडपणे कामे केली जात असल्याचे दिसत आहे. पाइपलाइन तथा लिकेज आदी कामे वेळेत पूर्ण न झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून यावर कार्यकारी अभियंता चुप्पी साधून बसले आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून जुन्या दर्यापुरातील पाण्याच्या टाकीचा प्रश्‍न प्रलंबित आहे. निधी उपलब्ध असतानासुद्धा कामे केली जात नाहीत. कंत्राटदार कधीच येत नाहीत. त्यांचे दर्यापुरातील कामावर लक्ष नाही, मन मानेल तशी कामे केली जात असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. कार्यकारी अभियंता दुर्लक्ष करीत आहेत. यावर आता नागरिकांनी थेट आमदार बळवंत वानखडे यांना साकडे घालत प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली. दर्यापुरातील उपविभाग अधिकारी व कर्मचारी सदर प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र वरिष्ठस्तरावरून सहकार्य मिळत नसल्याने कामे प्रलंबित आहेत. तातडीने कार्य करून प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

संपादन - नरेश शेळके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT