smart toilet scheme still not complete in amravati 
विदर्भ

स्मार्ट प्रसाधनगृहाची योजना रखडली, २६ पैकी फक्त सहाचे बांधकाम पूर्ण

कृष्णा लोखंडे

अमरावती : पर्याप्त जागा मिळू न शकल्याने महापालिकेची स्मार्ट प्रसाधनगृह योजना तडीस जाऊ शकलेली नाही. शहरातील विविध भागांत २६ प्रसाधनगृहे बांधण्याचे प्रस्तावित असताना गेल्या पाच वर्षांत सहा प्रसाधनगृहे बांधण्यात आली आहेत. त्यातील केवळ गाडगे नगर व महापालिकेतील प्रसाधनगृह नागरिकांच्या कामात येऊ शकले.

स्वच्छता व बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना विशेषतः महिलावर्गाची कुचंबना थांबविण्यासाठी स्वच्छता विभागाकडून शहरातील विविध भागांत 26 स्मार्ट प्रसाधनगृह बांधण्याची योजना आहे. स्वच्छता विभागाकडून अशा जागा निश्‍चित करण्यात आल्यात. यामध्ये नागरिकांची ज्या भागात अधिक वर्दळ आहे अशा भागांची निवड करण्यात आली. गाडगेनगर, वेलकम पॉईंट, पीडीएमसी (पंचवटी), नमूना (भोंगाडे मार्केटजवळ), प्रभात चौक, जिल्हा सामान्य रुग्णालय व महापालिका मुख्य प्रशासकीय इमारत परिसर या भागांचा विशेषत्वाने सहभाग आहे. हा सर्व भाग बाजारपेठेचा असल्याने त्यास प्राधान्य देण्यात आले. यापैकी महापालिका, प्रभात चौक, नमूना व गाडगेनगर येथे प्रसाधनगृहांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यातील महापालिका परिसरातील प्रसाधनगृह सेवेत आले असून प्रभात चौक व नमूना येथील हस्तांतरित व लोकार्पीत व्हायची आहेत.

पीडीएमसी येथील बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. पीडीएमसीचे सहकार्य मिळत नसल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे. वेलकम पॉईंट येथे आवश्‍यक तेवढी जागा उपलब्ध नाही. ऊर्जा विभागाने त्यांच्या आवारात सुविधा दिली असून ती नागरिकांच्या वर्दळीच्या तुलनेत कमी पडत आहे. महापालिकेने निवड केलेल्या भागांत जागाच मिळत नसल्याने ही योजना धुळखात पडली आहे.

बहुपयोगी प्रसाधनगृह -
26 ठिकाणी बांधण्यात येणारे प्रसाधनगृह बहुपयोगी आहे. महिला व पुरुष अशा दोन्ही घटकांसाठी सोय त्यामध्ये असून चेंजिंग रूम्ससह प्रत्येकी दहा सीटस उपलब्ध आहेत. एका प्रसाधनगृहासाठी चाळीस लाख रुपये खर्च निश्‍चित करण्यात आला असून 14 वित्त आयोगातून पुरेसा निधी उपलब्ध आहे.

हेही वाचा -

संकुलातील प्रसाधनगृहांना टाळे -
बाजारपेठेतील व्यापारी संकुलातील प्रसाधनगृहांमध्ये ग्राहकांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. प्रत्येक संकुलात महिला पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहाची सोय आहे. मात्र, त्याला संकुलातील व्यापाऱ्यांनी टाळे ठोकले आहे. त्यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

SCROLL FOR NEXT