file photo
file photo 
विदर्भ

सामाजिक बांधिलकी जपून डॉ. भारत लाडे यांनी केले अनाथ मुलांना स्वेटरचे वाटप; अनाथांच्या चेहऱ्यावर फुलले हसू

संतोष रोकडे

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) : जन्मदात्या आईवडिलांचे छत्र हरपून हलाखीचे जीवन जगणाऱ्या अनाथ मुलांच्या मदतीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयाचे आयुष विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत लाडे धावून आले. सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या डॉ. लाडे यांनी मुलीचा पाचवा वाढदिवस तालुक्‍यातील अनाथ मुलांसोबत साजरा केला. त्यांना स्वेटर, अल्पोपाहार, मिठाई व रोख रकमेचे वाटप केले. हे सारे पाहून अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

 
अनाथ तसेच विधवा महिलांच्या मुलांना मदतीचे वाटप बोंडगावदेवी येथील मिलिंद बुद्धविहारात रविवारी (ता. १) करण्यात आले. यावेळी डॉ. भारत लाडे, बाजार समितीचे प्रशासक प्रशांत गाडे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कुलसुंगे, प्रदीप जोक्‍यानी, पनपालिया, भाग्यवान फुल्लुके, माजी सैनिक सुनील फुल्लुके उपस्थित होते.


तालुक्‍यातील निमगाव, बोंडगावदेवी, बाक्‍टी, मांडोखाल, धाबेटेकडी, विहीरगाव येथील जन्मदात्यांचे छत्र हिरावून गेल्याने खेळण्या-बाळगण्याच्या वयात निरागस मुलांवर अनाथ होण्याची वेळ आली. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून बोंडगावेदेवी येथील सामाजिक कार्यकर्ते अमरचंद ठवरे हे त्या मुलांच्या संपर्कात राहून त्यांच्या जीवनमानाचे वास्तव चित्र समाजासमोर मांडत आहेत. अनेक दानदाते त्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.

मुलीच्या वाढदिवशी अनाथ मुलांना स्वेटर वाटप

अनाथांची माय म्हणून जिल्ह्यात ओळखल्या जाणाऱ्या प्रा. डॉ. सविता बेदरकर यांच्या सहकाऱ्याने जिल्ह्यातील अनाथ मुलांना अन्नधान्यासह जीवनोपयोगी वस्तूंचा नियमितपणे घरपोच पुरवठा केला जात आहे. समाजात वावरणारे सामान्य, गोरगरीब, वंचित, अनाथांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी स्वतः त्याग करण्यात जीवनाचे खरे सार्थक आहे. असे ध्येय मनोमन अंगी बाळगणारे डॉ. भारत लाडे यांनी आपल्या मुलीचा पाचवा वाढदिवस अनाथ मुलांसह साजरा करून २० मुलांना स्वेटर, अल्पोपाहार, मिठाई, रोख रकमेचे वाटप केले.

अनाथांना मायेची ऊब

डॉ. लाडे यांनी अनाथांना लाडू व पेढे भरवून जन्मदात्यांची ऊब दिली. त्यांच्याशी संवाद साधला. प्रशांत गाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शैक्षणिक प्रगती करा, जन्मदाते सोडून गेले असले; तरी निराश होऊ नका, शिक्षण सोडू नका, स्वतःच्या पायावर उभे राहा, असे मार्गदर्शन केले. संचालन अमरचंद ठवरे यांनी केले. आयोजनासाठी विशाल ठवरे, मंगेश डोये, समीर मेश्राम यांनी सहकार्य केले.

‘मोठे ध्येय गाठण्याचा संकल्प करा’

जीवनात आपल्याला मोठे ध्येय गाठायचे आहे, असा संकल्प ठेवा, स्वतः सक्षम बना, शाळा शिका तुम्हाला अडचण येणार नाही, यासाठी सहकार्य करेन, जन्मदात्याची उणीव भासू देणार नाही, असे सांगत डॉ. लाडे यांनी अनाथांना पालकत्वाची जोड दिली.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT