seeta mandir 
विदर्भ

श्रीक्षेत्र रावेरी येथील सीता मंदिरातील माती अयोध्येला रवाना! वाचा काय आहे इतिहास

राजकुमार भीतकर

राळेगाव (जि. यवतमाळ) : येत्या 5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन आहे. त्यासाठी भारतातील विविध ठिकाणची माती आणि जल अयोध्येला रवाना होते आहे. विदर्भातील रावेरी येथील मातीही अयोध्येला रवाना झाली आहे. त्यामागे विशेष पौराणिक संदर्भ आहे. तो म्हणजे रावेर इथे भारतातील एकमेव सीता मंदिर आहे. म्हणूनच यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव शहरापासून तीन किलोमीटर असलेल्या श्रीक्षेत्र रावेरी येथील माती (मृदा ) व रामायणात उल्लेख असलेल्या तमसा नदीचे (रामगंगा )जल, जगातील एकमेव भव्यदिव्य अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या पायाभरणी करीता पाठविण्यात आली.

5 ऑगस्टला होणाऱ्या अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या पायाभरणीच्या निमित्ताने पुन्हा रावेरी हे गाव व येथील सीता मंदिर पुन्हा प्रकाश झोतात आले आहे. रावेर इथे सीता मंदिर असण्याला पौराणिक संदर्भ आहे.

श्रीरामाने राज्याभिषेकानंतर लोकोपवादामुळे माता सीतेला वनवासात सोडले होते, तेव्हा सीतेचे वास्तव्य दंडकारण्याच्या याच भागात होते. इथे श्रीवाल्मिकी ऋषींचा आश्रम होता. सीतामाईनी त्या आश्रमातच लवकुशांना जन्म दिला. लवकुशांनी आपले शिक्षण याच ठिकाणी श्री वाल्मीकी ऋषिच्या मार्गदर्शनात पूर्ण केले. ते धर्नुविद्येत निपूण झाले. आजही वाल्मिकी ऋषिंच्या आश्रमाच्या खुणा याठिकाणी पहायला मिळतात.

सविस्तर वाचा - काय सांगता! प्रतिबंधित क्षेत्रातील सीसीटिव्हिला चोरीची वीज;  वर्धा जिल्ह्यातील नामदेव मठ परिसरातील प्रकार..

प्रभू श्रीरामानांनी अश्वमेघ यज्ञाचा घोडा संपूर्ण भारतवर्षात सोडला तो घोडा बाल लवकुशांनी याच ठिकाणी अडविला, अशी आख्यायिका आहे. सीतामातेच्या वास्तव्याने पावन झालेल्या या ठिकाणी सीता मंदिर आहे. त्यामुळे त्या मंदिराचे विशेष महत्त्व आहे. म्हणूनच मंदिर पारिसरातील मृदा (माती) आणि रामगंगा नदीचे जल अयोध्या येथील मंदिराच्या पायाभरणीसाठी पाठविण्यात आले असून त्यामुळे रावेरी येथील सीता मंदिर पुन्हा अयोध्येशी जोडले जाणार आहे. मंदिर परिसरातील माती (मृदा )पाठवितेवेळी मंदिर परिसरात विधीवत पूजा करण्यात आली आणि खोदकाम करून माती अयोध्येला पाठविण्यात आली. यावेळी गावकरीउपस्थित होते.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT