file photo
file photo 
विदर्भ

चंद्रपूर जिल्ह्यात "सोलर चरखा क्‍लस्टर'

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : चांदा ते बांदा योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चार तालुक्‍यांत "सोलर चरखा क्‍लस्टर' करण्यात येणार आहे. याकामासाठी आठ कोटी 13 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. राज्याचे अर्थ, नियोजन, वन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून याला मान्यता मिळाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, पोंभुर्णा, गोंडपिंपरी आणि राजुरा तालुक्‍यांमध्ये हे सोलर चरखा क्‍लस्टर करण्यात येत आहे. या नावीन्यपूर्ण कामास राज्यस्तरीय समितीने 8 जानेवारी 2019 रोजीच्या बैठकीत मान्यता दिली होती. त्यानुसार आता या कामासाठी 813 लाख एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासंबंधीचे प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना विशेष बाब म्हणून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य शासन महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करत आहे. यापार्श्‍वभूमीवर सोलर चरखा क्‍लस्टरच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देताना खादीला प्रोत्साहन देण्याचे धोरण ही शासनाने स्वीकारले आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे आणि स्वदेशी चळवळीचे प्रतीक म्हणून चरख्याकडे पाहिले जाते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकाखालील क्षेत्र आहे. परंतु, कापसापासून तयार होणाऱ्या गाठी, पुढील प्रक्रिया करणारे उद्योग या भागात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या नगदी पिकाला योग्य भाव मिळत नाही. हेच लक्षात घेऊन चांदा ते बांदा या पथदर्शी विकास योजनेतून खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मदतीने कापूस ते कापड प्रकल्प सुरू करण्याचा, कापसाचे मूल्यवर्धन करून या पिकाला चांगला भाव देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
सुताचा दर्जा सुधारणार
मोठमोठ्या वस्त्रोद्योग कंपन्या खादी गारमेंट उत्पादनात उतरत आहेत. या पार्श्‍वभूमीवर चरख्यांच्या माध्यमातून खादीचे उत्पादन वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. पारंपरिक अंबर चरख्यावर होणारी सूतकताई, त्यासाठी महिलांना घ्यावे लागणारे परिश्रम, मिळणारे अत्यल्प उत्पन्न, उत्पादन आणि सुताचा दर्जा यामध्ये अमुलाग्र सुधारणा सोलर चरख्यांच्या माध्यमातून करणे शक्‍य झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT