son and father died by drowning in lake at wadaki of yavatmal 
विदर्भ

हृदयद्रावक! मुलगा बुडताना पाहून वडील धावले मदतीला, पण दोघांचाही झाला अंत

शंकर जोगी

वडकी (जि. यवतमाळ): गुरे चारायला गेलेल्या पितापुत्राचा एका खोल खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. वडकी तालुक्यातील खैरी गावाजवळ नाल्यालगत शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एकाचवेळी बापलेकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अजाब तनसुजी वानखेडे (वय ४५), असे पित्याचे, तर गणेश अजाब वानखेडे (वय १३), असे मृत मुलाचे नाव आहे. कोसारा रस्त्यालगत भिंगे घाटाच्या पुलाजवळ मुरुमाचे खोदकाम केले आहे. त्यामुळे त्याठिकाणी भला मोठ्ठा खड्डा पडला आहे. याठिकाणी गणेश गुरे चारत होता. त्यावेळी त्याचा तोल गेल्याने तो खड्ड्यात पडला.  मुलगा पाण्यात बुडू लागल्याचे पाहून बापाने मुलाचा जीव वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी त्वरीत पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी राळेगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. एकाचवेळी बापलेकाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT