home-quarantines 
विदर्भ

हरियाणावरून नागपूरपर्यंत आले मजूर, गृहमंत्र्यांच्या मुलाने अशी केली मदत

चेतन देशमुख

यवतमाळ : लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून फरीदाबाद (हरियाणा) येथून नागपूर पर्यंत आले. याठिकाणी अडकून पडलेले जिल्ह्यातील 17 मजूरांच्या मदलीता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख धावले. मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांना वाहनाने घाटंजी तसेच आर्णी तालुक्‍यापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली.

त्यात महिला, लहान मुले, आणि त्यांच्या घरातील कर्तांचा समावेश आहे. कामानिमित्त घाटंजी तसेच आर्णी तालुक्‍यातील अनेक नागरिक फरिदाबाद (हरियाणा) येथे गेले होते. लॉकडाउनमध्ये राज्यातील कामगार, मजूर, व्यापारी व त्यांचे कुटुंबीय असे अनेक जण वेगवेगळ्या भागात अडकून पडले आहेत. त्यांना राज्यात पुन्हा येता यावे, यासाठी श्रमिक रेल्वे सुरु करण्यात आली आहे. घाटंजी तसेच आर्णी येथील हे मजुरांनी फरिदाबाद ते दिल्ली असा प्रवास केला. त्यानंतर रेल्वेने शनिवार (ता.13) पहाटे साडेपाच वाजता नागपूर स्थानकांवर पोहोचले. 

याठिकाणावरुन जिल्ह्यात येण्यासाठी त्यांना वैद्यकीय तपासणी गरजेची होती. जिल्हाबंदी असल्याने पासची गरज होती. पहाटेच पोहोचल्याने त्यांना काय करावे सूचन नव्हते. त्यामुळे मजुरातील एकाने घाटंजी तालुक्‍यातील पोळीखुर्द येथील भावाशी संपर्क साधला. त्यांने सर्व प्रकार राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या मनिषा काटे यांच्या कानावर घातला. काटे यांनी लगेचच जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांना माहिती दिली. सलील देशमुख यांनी मजुरांचा मोबाईल नंबर घेतला. ते कुठे आहेत, त्यांची विचारपूस केली. काही वेळातच मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्‍टरांची टीम तयार झाली.

मजुरांची तपासणी केल्यानंतर त्यांना चहा-नाश्‍ताची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यात मजुरांना जाता यावे यासाठी बस नसल्याने वाहन व्यवस्था करून त्यासाठी पास काढून दिली. त्यानंतर शनिवारी (ता.13) मजुर नागपूरवरून आपल्या गावी पोहोचले. मजुरांना कोणतीही अडचण होवू नये, यासाठी काही कार्येकर्ते नागपुरात त्यांच्या सोबत होते. यात आर्णी तालुक्‍यातील तीन, घाटंजी तालुक्‍यातील 15 मजुरांचा समावेश होता.

कोणतीही ओळख नसताना राज्याच्या गृहमंत्र्यांचा मुलगाच काळजीने विचारपूस करीत असल्याने मजुरांनाही त्यांचे नवल वाटले. विशेष म्हणजे, सायंकाळी सलील देशमुख यांनी घरी पोहोचले की नाही, यासाठी मजुरांशी संपर्क साधला. परतलेल्या मजुरांनी जिल्ह्यात आल्यानंतर पुन्हा आरोग्य तपासणी केली असून ते सध्या आपापल्या गावात क्वारंटाईन झाले आहेत.

नागपुरात पोहोचल्यानंतर गावी येण्यासाठी बस नव्हती. जिल्हाबंदी असल्याने परवानगी आवश्‍यक होती. ओळखीचे कुणीच नसल्याने मी घरी भावाला माहिती दिली. काही वेळेनंतर काही जण आम्हाला शोधत आली. ते कोण होत आम्हाला माहिती नव्हते. त्यांनी आरोग्य तपासणी, गाडी, पास, चहा, नाश्‍ताची व्यवस्था करून दिली. नंतर आम्ही विचारले असता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा स्वत: मदत करीत असल्याने आश्‍चर्य वाटले. आम्ही अडचणीत असताना आम्हाला झालेली मदत कधीच विसरू शकणार नाही. 
- योगीराज राठोड, मजूर, पोळीखुर्द, (ता. घाटंजी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी अन् गारपिटीचे संकट, ७ जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील २ दिवस धोक्याचे

Latest Marathi News Live Update : आजचा दिवस प्रत्येक हिंदू आणि मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुढीपाडव्यानिमित्ताने वक्तव्य

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा पिकांना दणका! राज्यभरात फळबागांचे मोठे नुकसान; तासभर गारांचा मारा..

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

SCROLL FOR NEXT