son in law killed his mother-in-law
son in law killed his mother-in-law son in law killed his mother-in-law
विदर्भ

पती-पतीच्या भांडणात मध्यस्थी करणे भोवले; जावयाने केला सासूचा खून

सकाळ डिजिटल टीम

शेंदूरजनाघाट (जि. अमरावती) : वरुड तालुक्यातील शेंदूरजनाघाट ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर परिसरात जावई व मुलीच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या सासूवरच लाकडी काठीने वार करून जावयाने खून (killed) केला. चंद्रकला संतलाल तुमडाम (६०, रा. मलकापूर, पुनर्वसन) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. सासूची हत्या केल्याप्रकरणी जीवनू धुर्वे याला दोन तासांच्या आत पोलिसांनी अटक केली. (son in law killed his mother-in-law)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील संतलाल तुमडाम (३०) यांच्या तक्रारीवरून शेंदूरजनाघाट पोलिसांनी संशयित जीवनू रिमकलाल धुर्वे (३८, रा. चारनेटी, ता. मोक्कड, जि. छिंदवाडा) विरुद्ध रविवारी (ता. तीन) खुनाचा गुन्हा दाखल केला. न्यायालयाने जीवनू धुर्वे यास मंगळवारपर्यंत (ता. पाच) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

जीवनू धुर्वे हा सुनील तुमडाम यांचा जावई आहे. जीवनू हा पत्नी फुलवती हिला त्रास देत असल्यामुळे वर्षभरापासून मध्य प्रदेश येथून मलकापूर येथे तीन मुलांसह राहत आहे. अधूनमधून पती पत्नीकडे येऊन वाद घालत होता. आठवड्याभरापूर्वी पुन्हा जीवनू याने पत्नी फुलवतीसोबत वाद घातला व निघून गेला. शनिवारी (ता. दोन) मध्यरात्री बारा ते एक वाजताच्या सुमारास तो पुन्हा पत्नी फुलवती राहत असलेल्या घरी आला. त्यावेळी त्याची सासू चंद्रकला संतलाल तुमडाम ही मुलीकडे हजर होती.

जीवनूने पत्नीला शिवीगाळ सुरू केली व मध्य प्रदेशला चालण्याचा आग्रह धरून मारहाण केली. मुलीसोबत सुरू असलेला वादा मिटावा, यासाठी सासू चंद्रकला यांनी जावयाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, रागाच्या भरात जावई जीवनू याने सासू चंद्रकला तुमडाम यांच्या डोक्यावर काठीने पाच ते सहा वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या चंद्रकलाबाई यांचा जागीच मृत्यू (killed) झाला. मृत महिलेचा मुलगा सुनील तुमडाम यांच्या तक्रारीवरून जीवनू धुर्वेविरुद्ध खुनाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT