रशियन सैन्यांनी महापौरांना ओलीस ठेवले; युक्रेनचा दावा

Russia Ukraine War
Russia Ukraine War Russia Ukraine War

युक्रेनच्या प्रमुख शहरांच्या ११ महापौरांना रशियन सैन्याच्या ताब्यात घेतले (Russian troops took the mayor hostage) आहे. त्यांना ओलीस ठेवण्यात आले आहे. यामध्ये किव्ह, खेरसन, खारकिव्ह, झोपोरिझिया, मायकोलेव्ह आणि डोनेस्तक येथील स्थानिक नेत्यांचा समावेश आहे, असा दावा उपपंतप्रधान इरियाना वेरेशचुक यांनी व्हिडिओ संदेशातून केला आहे.

रशिया (russia) आणि युक्रेनमधील युद्धाला ४० दिवस झाले आहेत. रशियन सैन्याने पुन्हा एकदा किव्हवर ताबा मिळवल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, रविवारी अशी काही छायाचित्रे समोर आली आहेत, ज्यामध्ये रस्त्यावर बेवारस मृतदेह पडलेले दिसत आहेत. रिपोर्ट्सनुसार, रशियन सैन्याने किव्हमध्ये रशियन सैनिकांवर गोळीबार केला आणि त्यात अनेक लोक मारले गेले.

Russia Ukraine War
Goa : प्रमोद सावंतांना महत्त्वाचं खातं, तर राणेंना काय मिळालं?

रशियन (russia) सैन्याने केलेल्या हल्ल्यात किव्हच्या मोतीजिन गावाचा प्रमुख आणि पत्नी मारली गेली. आम्ही इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसला (ICRC) माहिती देत ​​आहोत की, रशियन हल्ल्यानंतर अनेक नागरिक बेपत्ता झाले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार काम केले पाहिजे, असेही उपपंतप्रधान इरियाना वेरेशचुक म्हणाले.

रशियन शहरात दोन स्फोट?

रशिया आणि युक्रेनमधील (ukraine) संघर्षाने आता नवे वळण घेतले आहे. रविवारी युक्रेनच्या सीमेजवळील बेल्गोरोड या रशियन शहरात दोन स्फोटांचे आवाज ऐकू आले. मात्र, या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. बेलगोरोडमधील या ताज्या स्फोटाच्या दोन दिवसाआधी येथील इंधन डेपोवर हवाई हल्ला झाला होता. तीन दिवसांत रशियाच्या भूमीवर दोन हल्ले झाल्याने जगाच्या नजरा आता पुतिन यांच्या पुढच्या पावलावर खिळल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com