आत्महत्या sakal
विदर्भ

सासुरवाडीला पत्नीला आणायला आलेल्या जावयाची आत्महत्या

चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे घटना घडली

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली - सासुरवाडीला पत्नीला आणायला आलेल्या जावयाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार (ता. ३१) चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे घडली. योगेश आकाराम बन्सोड (वय ३४) रा. इंदिरानगर, नागपूर असे मृताचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार योगेश बन्सोड हा नागपूर येथील रहिवासी असून तो सोमवारी आष्टी येथील त्याचे सासरे धनराज देठे यांचे घरी पत्नी स्नेहा हिला नेण्यासाठी आला होता. रात्री जेवण झाल्यानंतर मृत योगेश व त्याची पत्नी स्नेहा बाहेर फिरायला गेले होते. या दाम्पत्याची झोपण्याची व्यवस्था करून सासू, सासरे छतावर झोपण्यासाठी गेले. मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास योगेश उलटी करीत असल्याचा आवाज आल्याने सासू सुमित्रा देठे यांनी खाली येऊन काय झाले, अशी विचारणा केली असता मी विष घेतले, असे त्यांनी सांगितले.

लगेच योगेशला दुचाकीने आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. घटनेची माहिती मिळताच मृताची आई व नातेवाईकांनी सखोल चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणी मृताने पत्नीच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती मिळाली असून ही चिठ्ठी त्यानेच लिहिले की दुसऱ्याने याची सत्यता पोलिसांच्या तपासानंतरच समोर येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahabaleshwar Rain Record : महाबळेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार, 24 तासांत 513 मिमी पाऊस; मोडला तब्बल 123 वर्षांपूर्वीचा विक्रम, प्रशासनाकडून हायअलर्ट जारी

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 44 बंधारे पाण्याखाली, 3 मुख्य राज्य महामार्ग बंद; 'पंचगंगा' इशारा पातळीच्या अगदी जवळ, गगनबावड्यात 101 मिमी पाऊस

Latest Marathi News Update: खडकवासला धरणात येणाऱ्या ओढ्याला पूर, पाबे घाटरस्त्यासह महत्त्वाचे मार्ग बंद

Pune Rain: आळंदीतील पूरस्थितीमुळे वारकऱ्यांसाठी पुण्यात मोठी व्यवस्था! पुढील पाच दिवस पाणी कपात देखील रद्द, महापालिकेचा मोठा निर्णय!

Koyna Dam Update : अवघ्या काही तासांत कोयना धरणाचा पाणीसाठा 30 TMC पार; पुढील 24 तास 'हायअलर्ट', गावांना दरडीचा धोका, धरण प्रशासनाचा मोठा इशारा

SCROLL FOR NEXT