file photo 
विदर्भ

जावई-सासऱ्याने दारूच्या नशेत उकरून काढला जुना वाद अन्‌ मग घडले असे

सकाळ वृत्तसेवा

बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : गावात पूजा झाली. बकऱ्याचे जेवणही झाले. सोबत जावई चुलत सासरे दोघांनीही मस्त "दारू'ही ढोसली. त्यानंतर मद्याच्या नशेतच संपत्तीचा जुना वाद उफाळून आला. शाब्दिक वाद हाणामारीवर आला. यात जावयाने चुलत सासऱ्याला जबर मारहाण केली.

मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. सुकरू वाघू सिडाम (वय 70) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी विकास विठोबा मडावी याला ताब्यात घेतले आहे. ही घटना तालुक्‍यातील आसेगाव येथे घडली.
 

आसेगावात देवपूजा

बल्लारपूर तालुक्‍यातील आसेगावात सात जून रोजी रात्री पूजा झाली. नेहमीप्रमाणे जावई विकास विठोबा मडावी आणि चुलत सासरे सुकरू वाघू सिडाम यांनी आधी मद्य आणि त्यानंतर मटणावर ताव मारला. दोघेही भरपूर प्याले होते. यातून दोघांत घरालगत असलेल्या जागेचा वाद उफाळून आला.

रुग्णालयात मृत्यू

अवघ्या काही क्षणात या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. जावई विकास मडावी याने गोटे आणि लाठी काठीने 70 वर्षीय सासरे सुकरू सिडाम यांच्यावर हल्ला चढविला. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. त्यांना सात जून रोजी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी (ता. 8) उपचार घेणाऱ्या सासऱ्याचा मृत्यू झाला.

गावात स्मशान शांतता

घटनेनंतर नेहमी वर्दळ असणाऱ्या गावात स्मशान शांतता पसरली आहे. घटनेतील आरोपी जावई विकास विठोबा मडावी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शिवलाल भगत, एपीआय बोदके आणि जोशी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, Video: वैभव सूर्यवंशीची दोन सिक्ससह दणक्यात सुरुवात, पण मग कशी पडली विकेट? माघारी जाताना झाला भावूक

तुम्हीच सांगा उपवास कसा करायचा? सणासुदीच्या काळात भगरीच्या किंमतीत दुप्पटीने वाढ, साबुदाणाही महागला, पण किती?

Nagpur RTO Crackdown: नागपूरमध्ये HSRP नसलेल्या वाहनांवर RTOची धडक कारवाई; तीन दिवसांत १७२ वाहनांवर ई-चलान, १.७२ लाखांचा दंड

Melghat Teachers Scam: मेळघाटातील कंत्राटी शिक्षक भरतीत मोठा घोळ? आरटीई व संचमान्यतेला हरताळ, प्रहार संघटनेचा पारदर्शक प्रक्रियेचा आग्रह

Nagpur Education : मनपाच्या नव्या इंग्रजी शाळा अजूनही कागदावरच; आठवडा उलटला तरी प्रवेशप्रक्रिया ठप्प, पालक संभ्रमात

SCROLL FOR NEXT