Soybean price sakal
विदर्भ

Soybean price : सोयाबीन हमी केंद्रांचा पत्ता गूल!

केंद्रांबाबत अद्याप आदेशाची प्रतीक्षा; ऑक्टोबर संपला तरी धोरण नाही

चेतन देशमुख : सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : सोयाबीन खरेदीसाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात हमी केंद्र सुरू केली जातात. यंदा सरकारच्या गोंधळात अजूनही खरेदी केंद्राबाबत निर्णय झालेला नाही. शासनाकडून सेंटर आयडी आणि पासवर्ड आलेले नसल्याने केंद्र बंद आहेत. सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात यायला सुरुवात झाली असून, आतातरी केंद्राबाबत निर्णय व्हावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

सोयाबीन विक्रीसाठी जिल्ह्यात १७ हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले जातात. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी केंद्र सुरू केले जातात. यंदा शेतकरी अडचणीत असतानाही सोयाबीन हमीभाव केंद्राबाबत निर्णय झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडी वाढल्या आहे. सरकार असले तरी गोंधळाची स्थिती दिसून येते. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनचे हमीभाव केंद्र उघडले जातात. यंदा ऑक्टोबर महिना संपून नोव्हेंबर सुरू झाला; मात्र केंद्राबाबत अजूनही आदेश आलेले नाही. किंबहुना सोयाबीनची नोंदणीही सुरू झालेली नाही.

सोयाबीन ओले असल्याने आधीच भाव कमी होत आहे. त्यात केंद्र नसल्याने व्यापाऱ्यांकडून दराबाबत मनमानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खुल्या बाजारात हमी दरापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी खासगी बाजारात शेतमाल विक्रीला पसंती दिली आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. पावसाने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. हमी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांची पसंती खासगी बाजारपेठेला जास्त आहे. खासगी बाजारात चारशे ते पाचशे क्विंटल आवक होत आहे. येणाऱ्या काही दिवसांत आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी का असेना, सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू होणे गरजेचे आहे.

ज्वारीसाठी जिल्ह्यात पाच केंद्र

शासनाने यंदा ज्वारीसाठी पाच हमीभाव केंद्र निश्‍चित केले आहेत. ज्वारीला दोन हजार ८५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव शासनाने जाहीर केला. ज्वारीसाठी केंद्र निश्‍चित झाले आहे. मात्र, सोयाबीन या महत्त्वाच्या पिकासाठी अजूनही हमीभाव केंद्र सुरू करण्याबाबत शासनाकडून हालचाल दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Success Story : नोकरी न सोडता पगाराव्यतिरिक्त तरुणीने केली ६३ लाखांची कमाई! उत्पन्नाचे सांगितले 'हे' ६ स्त्रोत, व्हायरल होतोय व्हिडिओ

Thalapathy Vijay Divorce Case : मुख्यमंत्री विजय थलपती यांचे विवाहबाह्य संबंध? घटस्फोट प्रकरणातील सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर; दोघांनाही कोर्टात राहण्याचे आदेश

Online Scam : मुंबईची घटना! मोबाईल गरम होताच बँक अकाऊंटमधले 70 हजार गायब, फ्रॉड नेमका काय? सुरक्षित कसं राहायचं पाहा

Latest Marathi News Live Update : CSMT मेट्रोत वारणा मिल्क सेंटरचा भव्य शुभारंभ! फडणवीसांचा मोठा संदेश

India A Squad Change: भारतीय संघात सलग दोन पराभवांनंतर अचानक बदल; 150 KPH वेगानं गोलंदाजी टाकणाऱ्या खेळाडूची निवड

SCROLL FOR NEXT