chinchvani.jpg 
विदर्भ

Video : अक्षय तृतीयेला चिंचोणीला हे विशेष महत्त्व...वाचा

सागर कुटे

अकोला : अक्षयतृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या दिवशीच्या विविध आख्ययिका ग्रंथांमध्ये पहावयास मिळतात. सण म्हटले की, काही गोडधोड आणि भोजनात वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी वऱ्हाडात चिंचोणीला विशेष महत्त्व आहे.

अक्षय तृतीया हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर, कैरीचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. वऱ्हाडात या दिवशी भोजनात चिंचोणीला महत्त्‍व आहे. 

ही चिंचोणी कर किंवा घागरमध्ये भरल्या जाते. कारण कर किंवा घागर ही मातीची बनलेली असते. मातीमध्ये गुणसत्त असतात आणि मातीला एक विशिष्ट प्रकारचा सुगंधही असतो. जुन्या काळात आजी व आई जेव्हा चिंचोणी बनवायचे त्यावेळेस ते घागरीमध्ये भरून ठेवायचे. हे पदार्थ आठ ते दहा दिवस टिकावे या एकच उद्देश होता. पूर्वी चिंचोणी करामध्ये भरण्याची पद्धत प्रचलित होती.

चिंचोणी तयार करण्याचे पदार्थ
गुळ, चिंच, विड्याची पाने, काथ, चुना, चिकन सुपारी, विलायची, वाळा, भिजवलेले तांदुळ, खोबरा खिस, चिंचेचा कोळ, तुप, लवंग, खसखस, मिठ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT