Navratri 2024 ambadevi temple in tarapur sakal
विदर्भ

Navratri 2024 : प्राणीमात्रांचा बळी वर्ज्य असलेले तारापूर येथील अंबादेवी जागृत देवस्‍थान, नऊ दिवस धार्मिक उत्सव

Navratri 2024 : तारापूर येथील अंबादेवी संस्थान प्राणीमात्रांचा बळी वर्ज्य करणारे जागृत देवस्थान आहे. नवरात्र महोत्सवाच्या काळात येथे भक्तिमय वातावरण निर्माण होते, आणि पर्यटकांमध्ये आध्यात्मिकतेचा संगम अनुभवता येतो.

सकाळ वृत्तसेवा

मोताळा : तारापूर येथील प्राणीमात्रांचा बळी वर्ज्य असलेले अंबादेवी संस्थान सर्वांचेच श्रद्घास्थान आहे.

नवरात्रात तारापूर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. हे एक जागृत देवस्थान आहे. ज्यांची मनोकामना पूर्ण झाली ते दर्शन घेऊन उडदाच्या भाकरीने नवस फेडतात. देवीचे संस्थान म्हटले की अनेक ठिकाणी प्राणिमात्रांच्या बळीने नवस फेडला जातो, मात्र येथे तसा प्रकार नाही.

सुमारे साडेपाच हजार वर्षांपूर्वी राजा हरिश्चंद्र यांच्या स्वप्नात आलेल्या महर्षी विश्वमित्र यांच्या शब्दानुसार त्यांनी वनवास घेतला व त्यानंतर काही वेळेसाठी राजा हरिश्चंद्र, राणी तारामती, राजकुमार रोहिदास, शेषनाग यांच्या आगमनाने पावन झालेली भूमी म्हणजेच आजचे श्रीक्षेत्र तारापूर होय.

पूर्ण भारतामध्ये फक्त उज्जैन आणि तारापूर या दोनच ठिकाणी हरिश्चंद्र तारामती यांचे मंदिर आहे. कोथळी गावामध्ये स्थापन महादेवाचे दोन हेमाडपंथी शिवालय पुरातन वास्तुकलांचा एक अद्भुत नमुना आहे.

श्रीक्षेत्र तारापूरमध्ये राजा हरिश्चंद्राने श्रीअंबादेवीच्या मूर्तीची स्थापना केली. अंबादेवीच्या उपासनेमुळेच राजा हरिश्चंद्र आणि त्यांच्या परिवाराचा वनवास संपला अशी आख्यायिका आहे. राजा हरिश्चंद्र व त्यांचा परिवार येथून गेल्यावर येथील आदिवासींनी श्रीगणेश, राजा हरिश्चंद्र, राणी तारामती, राजकुमार रोहिदास व शेषनाग यांच्या मूर्तींची स्थापना करून एक विशाल हेमाडपंथी मंदिर येथे बनविले.

अध्यात्म व पर्यटनचा संगम

नवरात्र महोत्सवात येथे दुपारी बारा वाजता व सायंकाळी पाच वाजता अशा दोन वेळा आरती होते. येथील प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार बुलडाणा अर्बन परिवाराने परिसरातील नागरिक व भाविक भक्तांच्या सहकार्याने केला आहे. तारापूर परिसर आध्यात्मसहित एक पर्यटन स्पॉट म्हणून नावलौकिकास येत आहे. परिसरातील डोंगर, हिरवळ, ओव्हरफ्लो असलेला पलधग प्रकल्प, यावर असलेली बोटिंग, ज्ञानगंगा अभयारण्य व त्यातील जंगल सफारी असा अध्यात्म व पर्यटनाचा सुरेल संगम येथे बघण्यास मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

आवडत्या क्रिकेटपटूविरोधात डॉ. आंबेडकरांनी लढवली होती निवडणूक, हा प्रसंग एकदा वाचाच...

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

SCROLL FOR NEXT