Bhagwan Yadav Sakal
विदर्भ

वरिष्ठांच्या त्रासामुळे एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

राजुरा येथील एस.टी. आगारात तिकीट निरीक्षक पदावर कार्यरत एका कर्मचाऱ्याने सोमवारी (ता. १६) आपल्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

राजुरा येथील एस.टी. आगारात तिकीट निरीक्षक पदावर कार्यरत एका कर्मचाऱ्याने सोमवारी (ता. १६) आपल्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली.

बल्लारपूर (जि. चंद्रपूर) - राजुरा येथील एस.टी. आगारात तिकीट निरीक्षक पदावर कार्यरत एका कर्मचाऱ्याने सोमवारी (ता. १६) आपल्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. आगारातील एटीआय टाले आणि चालक कोवे हे वारंवार पैशांची मागणी करीत होते. त्यांच्या त्रासामुळेच मी आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख मृतकाने सुसाईड नोटमध्ये केला आहे. मृताचे नाव भगवान अशोक यादव (वय ३०) आहे. या घटनेचा तपास बल्लारपूर पोलिस करीत आहे. वृत्तलिहेपर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नव्हती.

राजुरा येथील एसटी आगारात मृत भगवान अशोक यादव कार्यरत होते. ते बल्लारपुरातील शिवनगरात आपल्या कुटुंबीयांसह राहत होते. राजुरा येथील आगारात एटीआय टाले आणि चालक व्ही. एल.कोवे कार्यरत आहेत. हे दोन्ही कर्मचारी भगवान यादव यांना नेहमी त्रास द्यायचे. दर महिन्याला दहा हजार रुपयांची मागणी करायचे. पैसे न दिल्यास भगवान यादव यांना त्रास द्यायचे, असा आरोप यादव कुटुंबीयांनी केला आहे.

राखी असल्याने त्यांची पत्नी माहेरी गेल्या होत्या. घरी आई आणि भाऊ होते. रविवारी (ता. १४) रात्री अकरा वाजताच्या सुमारास भगवान यादव यांनी एका मित्राला फोन केला. त्यानंतर ते नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उशीरापर्यंत त्यांच्या खोलीचे दार बंदच होते. आई, भावाने आवाज दिला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद मिाला नाही. त्यामुळे आईने शेजाऱ्यांच्या मदतीने खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा भगवानने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. मृताच्या खोलीत एक चिठ्ठी आढळली. त्यात राजुरा एस. टी. आगारातील एटीआय टाले ही महिला कर्मचारी आणि चालक व्ही. एल. कोवे हे दोघे माझ्याकडून वारंवार पैसे मागत आहे. त्यांनी दिलेल्या नाहक त्रासामुळे मी आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख सुसाईट नोटमध्ये आहे.सुसाईट नोटमध्ये लिहिलेल्या आगारातील टाले आणि व्ही. एल. कोवे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेद झाल्यानंतर मोक्षधाम येथे भगवान यादव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबाचा आधार गेल्याने कुटुंबातील एका व्यक्तीला आगारात नोकरी मिळावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. घटनेचा तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे. वृत्तलिहेपर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नाही.

मृत व्यक्तीकडून एक सुसाईट नोट प्राप्त झाले आहे. आरोप गंभीर असून तपासाअंती सत्य बाहेर येईल.

- शैलेंद्र ठाकरे, एपीआय, तपास अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT