यवतमाळ : एस. टी. वाहनचालक महिलांसह महसूल राज्यमंत्री संजय राठोड.
यवतमाळ : एस. टी. वाहनचालक महिलांसह महसूल राज्यमंत्री संजय राठोड. 
विदर्भ

21 मुलींच्या हाती येणार "एसटी'चे स्टेअरिंग

सकाळवृत्तसेवा

यवतमाळ : आज महिला सर्वच क्षेत्रांत पुढे येत असताना, राज्याच्या इतिहासात प्रथमच परिवहन महामंडळात यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुलींना वाहनचालक म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे. यासाठी निवड झालेल्या मुलींच्या अभ्यासपूर्व प्रशिक्षणाला प्रारंभ झाला.
राज्यातही महिलांना एसटी चालक म्हणून संधी द्यावी, अशी विनंती महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली होती. त्यांनी ती मान्य केली आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून राज्य परिवहन महामंडळात विशेष बाब म्हणून अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला चालकांची भरती करण्याची घोषणा केली. आदिवासीबहुल यवतमाळ जिल्ह्यातील किमान शंभर मुलींची भरती करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, हे आव्हान स्वीकारण्यासाठी केवळ 25 मुली पुढे आल्या. त्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था करून त्यांना स्थानिक पातळीवर प्रशिक्षण देण्यात आले. त्यांचे हलके आणि अवजड वाहनचालक परवाने काढण्यात आले.
गेल्या 21 जानेवारी 2018 रोजी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या एका समारंभात या मुलींना महामंडळात वाहनचालक म्हणून नियुक्ती देण्याची घोषणा रावते यांनी केली. त्यानंतर उद्‌भवलेल्या विविध तांत्रिक अडचणी पार करीत एक वर्षानंतर यातील 21 मुलींचे चालकपूर्व प्रशिक्षण सुरू झाले आहे. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्यांमध्ये सुवर्णा मेश्राम, मनीषा गाडेकर, हर्षा लडके, ज्योत्स्ना ठाकरे, रंजना शेळके, सुशीला वडेकर, पूजा नैताम, गायत्री होलगरे, अंजुता भोसले, सुवर्णा कुंभरे, पूजा टेकाम, शिल्पा तडाम, सुवर्णा नागमोते, शिल्पा पेंदोर, सीमा गवळी, अनसूया मडावी, महानंदा ठाकरे, शीतल पवार, नम्रता आगलावे, सपना कुरसंगे, राधा दाभेकर यांचा समावेश आहे. मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण निवडपत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
परिवार उत्तम रीतीने चालविणाऱ्या महिला एसटी बससुद्धा सुरळीत आणि सुरक्षितपणे चालवतील, असे मत संजय राठोड यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, विभाग नियंत्रक अविनाश राजगुरे, विशेष कार्य अधिकारी मोहन जोशी, विभागीय वाहतूक अधिकारी राजू पंधरे, चालक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अनंत ताटर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT