file photo
file photo 
विदर्भ

पंढरपूर यात्रेसाठी एसटीचे हटके लूक

भूषण काळे

अमरावती ः पंढरपूरपर्यंत भाविकांच्या मुखात विठुनामाचा गजर राहतो. विठुमाऊलीला भेटण्याची आस भाविकाला लागलेली राहते. पंढरपूरच्या यात्रेचा सोहळा काही औरच राहतो. याच सोहळ्याचे चित्र आता महामंडळाच्या एसटीवर झळकणार आहे. भगवे झेंडे, विठ्ठलाची मूर्ती, टाळ-मृदंग, तुळस असे चित्राचे स्टीकर एसटीवर चिटकवल्या जाणार आहे. "वारी पंढरीची, विठुरायाच्या दर्शनाची' आणि "देव माझा, विठू सावळा' असे घोषवाक्‍य या स्टिकरवर लिहिण्यात येणार आहे. एमएस(स्टील) बॉडीच्या डिलक्‍स गाड्यांवर हे स्टिकर चिटकवले जाणार आहे. अमरावती जिल्ह्यात डिलक्‍स गाड्यांची संख्या 25 आहे. या संपूर्ण गाड्या पंढरपूर यात्रेसाठी रवाना होणार आहेत. या गाड्यांच्या दोन्ही बाजूने हे स्टिकर लावले जाणार आहे. महामंडळाच्या या नव्या एसटीचे लूक प्रवाशांच्या पसंतीस उतरणार आहे. महामंडळाच्या लालपरीला पर्याय म्हणून सातत्याने महामंडळाची एसटी कात टाकत आहे. सातत्याने एसटीच्या लूकमध्ये बदल घडून येत आहेत. पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी काही वेगळेपण असावे, या उद्देश्‍याने महामंडळ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. एसटीचे नवे हटके लूक पंढरपूर यात्रेत प्रवाशांना बघावयास मिळणार आहे.
नागपुरात फेरबांधणी
एसटी महामंडळात लाल बसची निर्मिती पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. त्याऐवजी आता एमएस (स्टील) बॉडीची डिलक्‍स गाड्यांची निर्मिती करण्यात येत आहे. एमएस बॉडीच्या बस फेरबांधणीचे काम औरंगाबाद आणि नागपूर येथे करण्यात येत आहे. शिवाय एमएस बॉडीत नवीन बस तयार करण्याचे काम पुणे येथे होणार आहे. पूर्वी लाल रंगाची बस बांधण्यासाठी अल्युमिनिअमचा वापर केला जात होता. त्यामुळे बसचे वजन कमी होत होते. आता एमएस (स्टील) बॉडीत बस तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT