msrtc sakal media
विदर्भ

ST Workers Strike : भाऊ बहिणीच्या नात्यात महामंडळाचे विरंजन

बस बंद असल्यामुळे बहिणींना भाऊबीजेला वेळेवर पोहोचणे झाले अवघड.

दिपक खेकारे

(चंद्रपूर) गडचांदूर : दीपावलीत भाऊ बिजेचा सण भावा बहिणीच्या अतूट बंधनातिल नात्याचा सण म्हणून ओळखला जातो. त्यामुळे रक्ताच्या नात्यासोबतच बहीण भावाच्या भावनिक नात्यालाही या सणामुळे वेगळीच ओळख मिळाली आहे. या वर्षी ऐन दिवाळीत महामंडळाच्या संपाने बहीण - भावाच्या नात्यात विरंजन पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संक्रमणाच्या भितीने राज्य व केंद्र शासनाने अनेक प्रतिबंध लादले गेल्यामुळे मागील वर्षी सुद्धा बहीण भावाला भाऊबीज पाहिजे त्या प्रमाणात साजरी करता आली नाही. अनेक बहिणींनी या वर्षी भाऊ बीज मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची आणि बीजेच्या दिवशी बंधुरायाला ओवाळण्याची तयारीत असतांना ऐन दिवाळीत बस च्या संपामुळे बहिणींचा खडतर प्रवास होणार आहे.

ग्रामीण परिसरात अनेक भागात दुसरा पर्याय नाही

जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात बस शिवाय दुसरा पर्याय नसल्याने भाऊ आपल्या बहिनेच्या प्रतीक्षेत असणार असून सासरी असणाऱ्या मुलीला दीपावलीत भाऊ बीजेच्या सणाला माहेरी काही दिवस घालवावे अशी इच्छा असते परंतु या वर्षी सुद्धा ही अशा नैराश्यात बदलण्याची परिस्थिती आहे.

"प्रत्येक वर्षी मी बस ने प्रवास करून बीजेच्या दिवशी बंधूरायाला ओवळण्यास जाते परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोंना मुळें आळकाठी आली. या वर्षी बीजेच्या दिवशी ओवाळण्यास भेटेल असं वाटलं परंतु महामंडळाच्या संपाने त्यांवर पाणी फेरले."

- आशा मांडवकर, गडचांदुर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT Qualifier 1 : चौकार गेला, हातातून बॅट सटकली अन् साई सुदर्शनचा 'गेम'झाला... IPL मधील सर्वात विचित्र विकेट Video

Gold Loan Fraud: बनावट सोन्याने १८ लाखांचा घोटाळा; एचडीएफसी बँकेच्या गोल्ड लोन व्हॅल्युअरसह १२ जणांवर गुन्हा

Sakal Vidya Education Expo : करिअरच्या वाटा; ३०, ३१ मे रोजी भेटा; काळेवाडीत ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’

अमरावतीच्या रामपुरी कॅम्पमध्ये शिरला बिबट; चार तासांनंतर वनविभागाने घेतले ताब्यात, नागरिकांची मोठी गर्दी

Music Composer Harsh Raut : लोकसंगीत कॉन्सर्टद्वारे उंचीवर नेण्याचा प्रयत्न; मोशीत शुक्रवारी ‘द फोक आख्यान’ कार्यक्रमाचे आयोजन

SCROLL FOR NEXT