dharmarao baba atram sakal
विदर्भ

Dharmarao Baba Atram : राज्याचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम नक्षल्यांच्या रडारवर; पत्रकातून दिली धमकी

अहेरी विधानसभेचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी अलीकडेच अजित पवार यांची साथ देत अन्न व औषध प्रशासन मंत्रीपद मिळवले आहे.

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली - अहेरी विधानसभेचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी अलीकडेच अजित पवार यांची साथ देत अन्न व औषध प्रशासन मंत्रीपद मिळवले आहे. तत्पूर्वीच ५ जुलै रोजी नक्षलवाद्यांनी एक पत्रक प्रकाशित केले असून सुरजागड येथील लोहखाणीला धर्मरावबाबा देत असलेल्या उघड समर्थनावरून सडकून टीका केली आहे.

तसेच जनता त्यांना जनआंदोलनात खेचल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या त्यांच्या कृत्याची किंमत चुकवावी लागेल असे नमूद करत धमकीही दिली आहे.

विशेष म्हणजे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांनी लोह प्रकल्पावरून मागील हिवाळी अधिवेशनातसुद्धा धमकी दिली होती. आता पावसाळी अधिवेशनादरम्यान पुन्हा एकदा नक्षल्यांचे एक पत्रक प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल झाले आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने दोन पानी पत्रक काढून धर्मरावबाबावर टीका केली आहे. सूरजागड लोहखाणीला विरोध अधिक तीव्र करा, असे आवाहन करून या प्रकल्पासह प्रस्तावित सहा लोह उत्खनन प्रकल्पांविरोधात नक्षलवादी उभे असल्याचे म्हटले आहे.

इथे विकासाच्या नावाखाली ग्रामसभांचे अधिकार धुडकावून लावत त्यांच्या परवानगीविना लोह उत्खनन सुरू आहे. तोडगट्टा येथील आंदोलनाला माओवाद्यांचा पाठींबा असल्याचे सांगत पोलिस प्रशासन हे आंदोलन बदनाम करत आहे. येथील आंदोलकांची धर्मरावबाबा आत्राम यांनी भेट घेतली. पण ते खाण कंपन्यांचेच समर्थन करत आहेत.

त्यामुळे जनता धडा शिकवेल. महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवर तोडगट्टा येथे सुरू असलेले खाणविरोधी आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहनही पत्रकातून केले आहे. दरम्यान, नक्षल्यांच्या या धमकीच्या पत्रकाची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतल्याची माहिती मिळाली आहे.

धमक्यांना घाबरत नाही - आत्राम

गेल्या कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोली जिल्ह्यात आता कुठे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे. सूरजागड प्रकल्पामुळे हजारो हातांना काम मिळाले आहे. याच प्रकल्पामुळे कित्येक घरांमध्ये चुली पेटत आहेत. लोकांचे जीवनमान उंचावत आहे. जिल्ह्याचा विकास हेच माझे ध्येय आहे. त्यामुळे अशा धमक्यांना मी घाबरत नाही आणि लक्षही देत नाही, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manmad News : मनमाड कृषी बाजार समितीतील अविश्वास ठराव फेटाळला; दीपक गोगड यांना दिलासा

Pimpri-Chinchwad Update : सायकल चालवा; कोंडी फोडा, प्रदूषण हटवा! ‘स्मार्ट सिटी’त पालिकेकडून ‘स्टार्ट अप’ने मुहूर्तमेढ

Punawale Traffic Jam : ‘एमएनजीएल’ वाहिनी फुटून वायुगळती, हजारो ग्राहकांना फटका; पुनावळे भुयारी मार्गाजवळ तीन तास कोंडी

ICICI Bank: बँकेची मोठी घोषणा... आता खात्यात 10,000 रुपयांऐवजी किमान 50,000 रुपये ठेवावे लागतील

PMC News : पांडवनगरमधील दीड हजार रहिवासी धोक्यात; महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत झाडं घरात!

SCROLL FOR NEXT