महागाव (जि. यवतमाळ) : माहूर-पुसद मार्गावर मंगळवारी रास्ता रोको करताना माळेगाव येथील ग्रामस्थ.
महागाव (जि. यवतमाळ) : माहूर-पुसद मार्गावर मंगळवारी रास्ता रोको करताना माळेगाव येथील ग्रामस्थ.  
विदर्भ

महिलेच्या मृतदेहासह ग्रामस्थांचा रास्ता रोको

सकाळ वृत्तसेवा

महागाव (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील माळेगाव येथे पाणी काढताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता.10) घडली होती. या घटनेचे तीव्र पडसाद आज, मंगळवारी बघावयास मिळाले. गुंज व माळेगाव येथील संतप्त ग्रामस्थांनी पुसद-माहूर मार्गावर महिलेच्या मृतदेहासह रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी दहा लाखांच्या मदतीची मागणी करण्यात आली.
विमल साहेबराव राठोड (वय 45) असे मृत महिलेचे नाव आहे. पाणीटंचाईमुळे महिलेचा मृत्यू झाला असताना एकाही प्रशासकीय अधिकाऱ्याने गावाला भेट दिली नाही. शिवाय मदतीची घोषणादेखील केली नाही. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी पुसद-माहूर मार्ग रोखून धरला. महिलेचा मृतदेह घेऊन ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते. रास्ता रोको आंदोलन दोन तास चालले. अधिकाऱ्यांनी उशिरा घटनास्थळ गाठल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. रास्ता रोकोमुळे श्रीक्षेत्र माहूर व महागावकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी पंचायत समितीचे सभापती गजानन कांबळे, गटविकास अधिकारी मनवर, ठाणेदार राठोड उपस्थित होते.
आंदोलकांच्या मागण्या
मृत महिलेच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये मदत जाहीर करावी, गावात सात विहिरी अधिग्रहीत करून पाणीपुरवठा करावा, प्रत्यक्ष गावात जाऊन लेखी आश्‍वासन द्यावे, अशा आंदोलकांच्या मागण्या आहेत. तहसीलदार नीलेश मडके यांनी लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Lok Sabha: उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT