तणाव झाल्यानंतर दंगा नियंत्रण पथकाच्या ताब्यात असलेला दुर्गापूर परिसर.  
विदर्भ

ईव्हीएमवरून दुर्गापुरात तणाव

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : बल्लारपूर मतदारसंघातील दुर्गापूर मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन घेऊन जाणा-या खासगी वाहनाला काही लोकांनी अडवल्यानंतर येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासनाने दंगा नियंत्रण पथक बोलाविले आहे. तीन हजारपेक्षा अधिक लोकांनी ईव्हीएम असलेल्या वाहनाला घेरले आहे. रात्री उशिरापर्यंत दुर्गापूर परिसरामध्ये तणाव होता. 
राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या दुर्गापूर येथे पाच मतदान केंद्रे होती. सायंकाळी मतदान पार पडल्यानंतर मतदार केंद्रातून निवडणूक अधिकाऱ्यांचे पथक ईव्हीएम हातात घेऊन बसस्थानकाकडे जात होते. दरम्यान या पथकावर लोकांना संशय आल्याने त्यांनी त्यांचा पाठलाग केला. यामुळे पथकातील अधिकारी घाबरले आणि पळून गेले. मात्र, अधिकाऱ्यांच्या मागे असलेले वाहन जमावाच्या हाती लागले. त्यात तीन ईव्हीएम आढळल्या. त्यावरून मतदान यंत्राची चोरी झाल्याची चर्चा पसरली. शेकडो लोकांचा जमाव घटनास्थळी जमा झाला. रात्री उशिरापर्यंत तीन हजारांपेक्षा अधिक लोक येथे गोळा झाले होते. तसेच कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. विश्‍वास झाडे, बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार राजू झोडे हे कार्यकर्त्यांसह तिथे पोहोचले. पाच मतदार केंद्रात आठ ईव्हीएम होत्या. यातील तीन जमावाच्या हाती लागल्या असे सांगतात. मात्र, याबद्दल अधिकृत तपशील मिळाला नाही. वाहनात सापडलेल्या तिन्ही ईव्हीएम या डेमो मशीन असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. उशिरापर्यंत या परिसरात लोकांनी घेराव घातला होता. पोलिसांनी डेमो मशीन असलेले वाहन घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता काही महिलांनी लोटांगण आंदोलन केले. तर कोणतीही अनुचित घडू नये म्हणून पोलिसांनी दंगा नियंत्रण पथकाला पाचारण केले असून परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या मतदारसंघात उमेदवार आहेत.  

 
.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोकरी वाचविण्यासाठी गुरुजींना ‘टीईटी’च्या 10 संधी! राज्यातील पावणेदोन लाख शिक्षक नाहीत पात्रता परीक्षा उत्तीर्ण; 31 ऑगस्ट 2028 नंतर ‘ही’ कारवाई

आजचे राशिभविष्य - 05 जून 2026

Poha Idli Recipe: पोह्यांपासूनही इडली बनते हे माहिती आहे का? चव अशी की पुन्हा पुन्हा बनवाल

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

SCROLL FOR NEXT