strike.jpg 
विदर्भ

एटापल्लीची बाजारपेठ बंद; आंदाेलन चौथ्या दिवशीही सुरु

मनोहर बोरकर

एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील विविध समस्यांना घेऊन केंद्र व राज्यात सत्ता असणाऱ्या भारतीय जनता पक्ष व भाजपा समर्थित व्यापाऱ्यांकडून (ता.16) शुक्रवारपासून सतत चार दिवस बाजारपेठ बंद असल्याने छोटे व्यापारी व सामान्य नागरिकांचे  जनजीवन विस्कळीत झाले आहे.  प्रशासनाकडून आंदोलनाची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. 

आंदोलनकारी व्यापारी व भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्या तरी कोणाकडून कोणाला काय मागणी केली जात आहे व त्या मागण्या कोण पूर्ण करणार आहे, हेच सामान्य नागरिकांना समजने कठीण झाले आहे. जर अशा समस्यांचे निवारण शासनाकडून होत असेल तर सत्ताधारी पक्षाने आंदोलन का करावे, आणि आंदोलन सत्ता पक्षाचे आहे, तर मागण्या मान्य होण्यास चार चार दिवसांचा अवधी का लागतो असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत.

जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये विज्ञान शाखेचे वर्ग सुरु करावे, बंद असलेली इंग्रजी माध्यमाची मॉडेल स्कूल सुरु करावे, दूरसंचार सेवेचा दर्जा सुधारण्यात यावा, विद्युत बिलातील मीटर भाड़े व विज अधिभार कमी करण्यात यावेत, एटापल्ली ते आलापल्ली रस्ता चौपदारी करावा व अहेरी जिल्हा निर्माण करण्यात यावा अशा वाजवी व सामान्य  मागण्या व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने बंद ठेऊन शासनाकडे केल्या आहेत.

सदर आंदोलनात भारतीय जनता पक्ष जिल्हा उपाध्यक्ष बाबूराव गंपावार, भाजप आदिवासी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष दीपक फुलसंगे, शहर महामंत्री सचिन मोतकुरवार, भाजप समर्थित व्यापारी संघटनेचे महेश पुल्लूरवार, संदीप सेलवटकर, विशाल बाला, दिलीप पुपरेड्डीवार, नरेश गाइन, नित्यानंद दास, विजय गजाडीवार, व राकेश तेलकुंटावार, आदी पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा परिषद हायस्कूलचे विद्यार्थी व दुकानदार सहभागी झाले आहेत. 

आंदोलनामुळे गेल्या चार दिवसांपासून सामान्य नागरिक व छोट्या व्यापाऱ्यांच्या कुटुंबावर उपसमारीची पाळी आली असून, अनेकांच्या घरी चुली पेटने कठीण झाले आहे. त्यामुळे शासन व प्रशासन स्तरावरुन भारतीय जनता पक्ष व त्यांचे समर्थित व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बाजारपेठ बंद आंदोलनाची त्वरित दखल घेण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT