file phote
file phote 
विदर्भ

Vidhan Sabha 2019 : सोशल मीडियावर उमेदवारांच्या प्रचाराचा झंझावात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : उमेदवारांकडून प्रचारासाठी वापर करण्यात येत असलेल्या "मॅटर'साठी परवानगी घेणे आवश्‍यक आहे. मात्र, सोशल मीडियावर विना परवानगीच प्रचारासाठी पोस्ट व व्हिडिओ टाकण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत एकाही उमेदवाराला नोटीस दिली नसल्याची माहिती आहे.काही वर्षांपासून प्रचार व प्रसारासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. या माध्यमातून खोटा प्रचारही करण्यात येतो. निवडणुकीत उमेदवारांना खर्चासाठी मर्यादा घालून दिल्या आहेत. मर्यादेपेक्षा जास्त रक्कम खर्च करता येत नाही. मागील लोकसभा निवडणुकीपासून निवडणूक काळात सोशल मीडियावरही लक्ष ठेवण्यात येत आहे. यासाठी सायबर सेलही तयार केला आहे. उमेदवारांना अर्ज भरतानाच सोशल मीडियाच्या खात्यांची माहिती देणे बंधनकारक आहे. माहिती न दिल्यास कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येते.नागपूर जिल्ह्यात 12 विधानसभा मतदार संघ असून, येथून 146 उमेदवार रिंगणात आहेत. यातील जवळपास सर्वच उमेदवार प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे सांगण्यात येते. काहींचे तर व्हिडिओसुद्धा आहे. अनेकांनी प्रचाराचे "मॅटर'ही तयार करून पोस्ट केले आहे. त्यांच्या समर्थकांकडूनही सोशल मीडियावर प्रचार होत आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रचार साहित्य किंवा ऑडिओ, व्हिडिओचा उपयोग करताना परवागनी घेणे आवश्‍यक आहे. मात्र, सोशल मीडियावर टाकण्यात येत असलेल्या "मॅटर'साठी परवानगीच घेण्यात येत नसल्याची माहिती आहे.काही दिवसांपासून 146 पैकी 55 उमेदवारांच्या सोशल मीडियावर सायबर सेल लक्ष ठेवून असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले होते. यातील तीनच उमेदवारांनी सोशल मीडियावर प्रचार करण्यास परवानगी मागितली होती. विनापरवानगी प्रचार करणाऱ्या एकाही उमेदवाराला विचारणा झाली नसल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT