मृत कृष्णा पिल्लारे
विदर्भ

ती खोलीत गेली अन् घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली

सकाळ वृत्तसेवा

राजुरा (जि. चंद्रपूर) : वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. १) सायंकाळी जाहीर झाला. निकाल बघताच अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने राजुरा येथील विद्यार्थिनीने रात्रीच गळफास घेऊन आत्महत्या केली. कृष्णा नंदकिशोर पिल्लारे (वय १८) असे तिचे नाव आहे. सर्वत्र दिवाळीचा आनंद असताना पिल्लारे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुसाईड नोटमध्ये कमी गुण मिळाल्याने आत्महत्या केल्याचा उल्लेख तिने केला आहे.

रामनगर येथील नंदकिशोर पिल्लारे हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. त्यांना दोन मुली. मोठी मुलगी पुण्यात शिक्षण घेते, तर लाहन क्रिष्णा बारावीनंतर नीटच्या परीक्षेची तयारी करीत होती. नीट परीक्षेचा निकाल सोमवारी सायंकाळी लागला. निकाल बघून कृष्णा आपल्या खोलीत गेली. त्यावेळी मोठी बहीण तिथे होती.

पाणी पिण्यासाठी मोठी बहीण खाली उतरली. त्याचवेळी कृष्णाने गळफास लावला. घरच्यांनी दार तोडण्याचा प्रयत्न केला. तोपर्यत कृष्णाने आत्महत्या केली होती. निकाल बघितल्यानंतर असा निर्णय ती घेईल असे कुणालाही वाटले नव्हते. मृत्यूपूर्वी तिने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये कमी गुण मिळाल्याने आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे.

नीट परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने तिने टोकाची भूमिका घेतली. तसा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे.
- चंद्रशेखर बहादुरे, पोलिस निरीक्षक, राजुरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk Video : सोनम वांगचुक यांनी उपोषण का सोडले, सरकारशी काय चर्चा झाली? व्हिडिओ शेअर करत सगळंच सांगितलं

भारतीय संघ 'घरच्या' मैदानावर पाहुणा म्हणून खेळणार! बाहेरचा संघ यजमान म्हणून मिरवणार; नेमकं असं का होणार? जाणून घ्या वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : आज रात्री आम्हाला अटक केली जाऊ शकते; CJP संस्थापक अभिजीत दीपके यांचा दावा

Car Stunt Video: धावत्या कारच्या छतावर बसून जीवघेणा स्टंट! Video Viral होताच पोलिसांची कारवाई, तरुणाने कान पकडून मागितली माफी

CM Joseph Vijay Movie : कायदेशीर लढाई आणि सेन्सॉरच्या आक्षेपानंतर अखेर 'जननायकन' रिलीज! थलपती विजय यांच्या शेवटच्या चित्रपटाची धमाकेदार एन्ट्री, 50 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती

SCROLL FOR NEXT