विदर्भ

शाळेत जाण्यासाठी निघालेला विद्यार्थी नाल्यात गेला वाहून

जितेंद्र सहारे

चिमूर (जि. चंद्रपूर) : तालुक्यातील पेठ भान्सुली येथील गणेश विलास नन्नावरे (वय १२) वर्ष हा ग्राम दर्शन विद्यालय, खडसंगी येथे सहाव्या वर्गात शिकतो. मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास शाळेत सायकलने जायला निघाला होता. अमरपुरी नाल्याच्या रपट्यावरून सायकलचा तोल जाऊन नाल्यात वाहून गेला. त्याचा शोध गावकऱ्यांच्या मदतीने घेतला जात आहे.

सोमवार रात्रीपासून चिमूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नाले तुडुंब भरले आहे. ग्रामीण भागातील लहान पुलावरून पाणी वाहत आहे. खडसंगी जवळील अमरपुरी गावाजवळील नाल्यावर असलेल्या लहान पुलावरून पाणी वाहत होते. या नाल्यावरील पुलावरून पेठ भान्सुली येथील विद्यार्थी ग्रामदर्शन विद्यालय खडसंगी येथील शाळेत जाण्यासाठी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास निघाले.

सहाव्या वर्गात असलेला गणेश नन्नावरे या १२ वर्षीय मुलाच्या सायकलचा तोल जाऊन नाल्यात पडला. त्याच्याबरोबर असलेल्या विद्यार्थ्यांनी आरडा ओरड करून याची माहिती गावकऱ्यांना दिली. गणेश वाहून गेल्याची माहिती चिमूर पोलिसांना देण्यात आली. त्वरित घटनास्थळावर पोलिस निरीक्षक मनोज गभने, साहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड, पोलिस कर्मचारी मानकर, गुट्टे तथा उरकुडे सोबत पोहोचले.

वाहून गेलेल्या गणेशचा अजूनही शोध लागलेला नाही. गावातील पोहणाऱ्या व पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध सुरू आहे. चंद्रपूर वरून मदत पथकास पाचारण केले आहे. काही वेळात हे पथक पोहोचेल, अशी माहिती साहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT