sports 
विदर्भ

खेळाडू विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांवर कोरोनाचे संकट; गुण मिळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्हं 

सकाळ डिजिटल टीम

आर्वी (जि. वर्धा ): कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्याकरिता शासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे शैक्षणिक सत्र सुरू झाले नाही. शासनाच्या क्रीडा विभागाने तथा खासगी मंडळांनींसुद्धा क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या नाही. यामुळे यंदा दहावी, बारावीची परीक्षा देत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत गुण मिळतील किंवा नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मार्च 2021 पासून देशातच नव्हे तर जगावर कोरोना विषाणूचे संकट ओढवले आहे. यावर नियंत्रण ठेवण्याकरिता शासनाने टाळेबंदीचा निर्णय घेतला. शाळा, कॉलेज, विद्यालये बंद झाली. सोबतच क्रीडा स्पर्धांवरसुद्धा निर्बंध आले. पाहता-पाहता दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रकसुद्धा जाहीर झाले आहे. मात्र, खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण कसे द्यायचे याचे निर्देश क्रीडा विभागाने दिले नाही. 

खेळामध्ये रुची असलेले विद्यार्थी आपला वेळ मैदानावर घालवत असल्याने त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. ते गुणाणुक्रमे मागे पडतात. ही बाब लक्षात घेऊन क्रीडा विभागाने तालुका, राज्य व राष्ट्रीयस्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावर्षी क्रीडा स्पर्धा झाल्याच नाही. शिवाय क्रीडा विभागाचे कोणतेच निर्देश प्राप्त झाले नाही. अशा अवस्थेत दहावी आणि बारावीचे खेळाडू विद्यार्थी क्रीडा सवलत गुणांपासून मुकण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

मैदानी खेळांवरील संकट कायम

मागील महिनाभरापासून कोरोना विषाणूने चांगलीच उचल खालली आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. एक दोन बांधितांची संख्या आता 50 च्या वर पोहोचली आहे. कधी टाळेबंदी लागू होईल याचा नेम नाही. मधल्या काळात शिथिलता आली मैदानावर खेळण्याची मुभा मिळाली. मात्र, स्पर्धा घेण्यावर बंदी आहेच. स्पर्धा होत नसल्यामुळे खेळाडूंमधील उत्साह हळूहळू कमी होत असून विद्यार्थ्यांमधून नाराजीचे सूर उमटत आहे, असे गांधी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दीपक वऱ्हेकर यांनी सांगितले.

तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेमध्ये विजय आणि पराजित झालेल्या संघामधील खेळाडूंना क्रीडा विभागाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे सवलतीचे गुण दिल्या जाते. मात्र, यावर्षी स्पर्धा झाल्या नाही. अशा अवस्थेत कोणत्या निकषावर सवलतीचे गुण देता येईल? याचे परिपत्रकसुद्धा शासनाने जारी केले नाही. त्यामुळे काहीच सांगता येणार नाही.
प्रवीण पावडे
क्रीडा शिक्षक
मॉडेल हायस्कूल

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटना! ६० तासानंतरही ८ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा आक्रोश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, आयुक्तांनी काय सांगितलं?

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित; महसूल विभागात गैरप्रकार, मंत्री बावनकुळेंची माहिती

Kaygaon News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापकांनीच उचलला तणनाशकाचा पंप; विद्यार्थी सुरक्षा आणि आरोग्याच्या काळजीसाठी पुढाकार

Mohol News : मोहोळ येथे पंचायत समिती प्रशासन व नगरपरिषद प्रशासनात मोठा संघर्ष, नवीन नगरपरिषद इमारत बांधकामाचा पेटला वाद

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

SCROLL FOR NEXT