Students are working as peon in rural areas 
विदर्भ

ग्रामीण भागात विद्यार्थी झाले शिपाई   

अमित साखरे

चामोर्शी : शिक्षण म्हणजे भविष्याची सर्वात मोठी गुंतवणूक असते. कारण विध्यार्थ्यांना शिक्षण घेऊन भविष्यात देशाच्या समाजाच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात परंतु विद्यार्थ्यांच्या हातात वह्या पुस्तके न राहता झाडू राहत असेल तर विद्यार्थी खरच देशाच्या समाजाच्या जबाबदाऱ्या पेलू शकतील काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण जिल्हा परिषदेच्या बहुतेक शाळा या शिपायाविना असून शाळांमध्ये विद्यार्थीच शिपायाची कामे करताना आहेत.

शाळा सुरु झाल्यानंतर वर्गखोल्यांची सापसफाई करणे, पाणी भरणे, घंटा वाजविणे यासारखे अनेक काम शिपाई नसल्या कारणाने विद्यार्थीच करीत असल्याचे चित्र जिल्हा परिषदेतील बहुतेक शाळांमध्ये दिसत असते. शिक्षकही दमदाटी करीत असल्याने विद्यार्थी काम करण्यास तयार होतात. त्यामुळे विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. परंतु बालपणाला त्यांची जाणीव नसते. शिपायाची कामे करावी लागत असल्याने विद्यार्थी तासिकेला बसू शकत नाही. त्यामुळे त्या विषयाच्या ज्ञानापासून विद्यार्थ्यांना मुकावे लागत आहे.

पटपळताळणीसाठी लाखोंचा खर्च करण्यात येते. परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. मंत्रालयात बसून कोणतेही निर्णय घेण्यापेक्षा शाळा फिरून शाळेतील उणीवा सरकारने जाणणे आवश्यक आहे. शाळेतील कामकाजासाठी तसेच विध्यार्थ्यांना कमला लावण्यापेक्षा शिपायांच्या नेमणुका जिल्हा परिषद शाळांमध्ये करणे आवश्यक आहे. एकीकडे सुशिक्षित बेरोजगार रोजगारासाठी भटकंती करतांना आढळतात तर एकीकडे मोठया प्रमाणात रिक्त पदांची संख्या आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्याची हेळसांड करणे थांबवून ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिपायाची पदे रिक्त आहेत. ती त्वरित भरून भविष्यातील देशाच्या, समाजाच्या विशेषता विद्यार्थ्यांच्या विकासासाठी हातभार लावण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT