विदर्भ

पाण्यासाठी जगणे नव्हे, जगण्यासाठी पाणी हवे 

सकाळवृत्तसेवा

नागपूर - दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवते. या संकटावर मात करण्यासाठी पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे आहे. पाण्याची समस्या भेडसावू नये यासाठी पाण्यासाठी जगणे नव्हे तर जगण्यासाठी पाण्याचा वापर करा, असा संदेश देत पाणी साठविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले. 

सकाळ एनआयईतर्फे लकडगंज येथील विनायकराव देशमुख शाळेत "पाणी बचत : काळाची गरज' या विषयावर शुक्रवारी वक्‍तृत्व स्पर्धा घेण्यात आली. मंचावर संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव जोशी, सचिव अविनाश देशपांडे, मुख्याध्यापक पद्माकर धानोरकर, उपमुख्याध्यापक पद्मा देशपांडे, पर्यवेक्षक अनिल आदमने, प्रमोद जोशी, समीर कोठे, मंगेश बावसे, दिवाकर पर्वते, प्रदीप बिबटे, विजया गायधनी, संतोष राठोड, चंद्रशेखर धार्मिक, शंतनू धारकर, मधुरा जोशी, मधुकर रामटेके, हेमंत तुळणकर, प्रशांत वाघमारे, ज्योती व्यास, भीमराव सातकर, मंदा गौपाले, स्नेहा पुराडभट, महेंद्र हारोडे, मुरलीधर केवतकर, संगीता ढोमणे, रंजना बिडकर, मुकुंद सापनेकर, सुबोध सिद्धभट्टी, योगिनी सराफ, रवींद्र कुंभारे, जयश्री आप्पा, शुभांगी देशपांडे, वैशाली देशमुख, राखी असोलकर, ममता ठाकरे, अमित सिंगरू, एस. मिश्रा, हरी कमाविसदार, कृष्णा बालपांडे, नभा चिडाम आणि कर्मचारी महेश वेळेकर, कपिल कापरे, सुरेश दुर्गे, रमेश देशपांडे, नितीन लोहकरे, सुखदेव सावते, चंद्रशेखर भोमले, संजय तुपकर उपस्थित होते. स्पर्धेतील विजेते मयूरी रेवाळे, मनीषा पारधी, अतुल दुरुगकर यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. परीक्षक उदय काळे, रामकृष्ण सावरकर होते. संचालन डॉ. पूनम चव्हाण यांनी केले. आभार विशाखा देशपांडे यांनी मानले. 

"सकाळ एनआयई'चा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळतो. विशेषत: विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी वाढण्याकरिता मदत होत आहे. 
- मधुकरराव जोशी, अध्यक्ष, विनायकराव देशमुख एज्युकेशन सोसायटी संस्था 

विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम होत राहिल्यास त्यांचा आत्मविश्‍वास वाढतो. तसेच विद्यार्थ्यांचे व्यासपीठावर बोलण्याचे धाडस वाढते. 
- अविनाश देशपांडे, सचिव 

"सकाळ'ने भविष्यातही नियमित असे उपक्रम घ्यावे. त्यामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढीस लागते. तसेच पाणी या विषयावर वक्‍तृत्व स्पर्धा घेतली. विद्यार्थी आणि पालक यांना जपून पाणी वापरा असा संदेश दिला. 
- पद्माकर धानोरकर, मुख्याध्यापक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT