prashnchinha school 
विदर्भ

Video : शाळा पाडायला आला जेसीबी, विद्यार्थी झाले संतप्त... मग उचलले हे पाऊल

प्रमोद काळबांडे

मंगरुळ चव्हाळा (जि. अमरावती) : मतीन भोसले यांच्या प्रश्नचिन्ह आश्रमशाळेतील चिमुकले विद्यार्थी नुकतेच रांगेने जेवायला बसले. घास दोन घास पोटात न जाते तोच, धुळीचे लोळ उठले. यंत्रांचा कर्णकर्कश आवाज घुमू लागला. विद्यार्थी भेदरले. ताटावरून उठले. एकच हल्लकल्लोळ झाला. "जेसीबी आले. जेसीबी आले'. चिमुकले विद्यार्थी धावले. यंत्रापुढे उभे ठाकले. "आमची शाळा पाडू देणार नाही', असे ठणकावून सांगू लागले. 

गुरुवारपासून मतीन भोसले त्यांच्या सहकाऱ्यांसह समृद्धी महामार्गावरच "बेमुदत धरणे' आंदोलनासाठी पेंडॉल टाकून बसले. महामार्गाचे काम सुरूच होते. सहाएक भलीमोठी यंत्रे उभी होती. शुक्रवारी मात्र आणखी 25 एक मोठी यंत्रे दाखल झाली. मतीन भोसले यांनी उभारलेल्या टिनाच्या खोल्या पाडायला पुढे निघाली. यंत्रांचा कानठळ्या बसविणारा आवाज ऐकूणच विद्यार्थी जेवणाच्या पंगतीवरून उठले. ते पुढे गेले आणि थेट यंत्रांना आडवे गेले. 

समृद्धी महामार्गात "प्रश्नचिन्ह' आश्रमशाळेची जागा गेली. त्यावेळी सरकारने अनेक आश्वासने दिली होती. परंतु, अद्याप पूर्तता झाली नाही. महामार्गाला लागूनच शाळेची इमारत असल्यामुळे धुळीचे लोळ इमारतींवर ढग बनवितात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आजार जडले आहेत. सहावीतील विवेक गजानन भोसले, तिसरीतील शेखर इर्जित पवार, दुसरीतील पीयूष सुभाष पवार यांना धुळीमुळे खाज सुटली आहे.

तिघेही खाजेमुळे त्रस्त झाले आहेत. पहिलीतील रोहित गजानन शिंदे, तिसरीतील सनी सरल राठोड, पाचवीतील ज्योती मुंगाजी बावस्कर यांना तर सतत खोकल्याची उबळ येत आहे. नववीतील शेखर लच्छीराम सोळंके हा विद्यार्थी तापाने फणफणत आहे. अशी जवळपास ऐंशीएक विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. 

फासेपारधी समाज भ्याड नाही. मागे हटणारा नाही. परंतु, सरकार छोट्या विद्यार्थ्यांचाही विचार करत नसेल तर आम्ही शिकावे कसे? शिक्षणाचा हा प्रकल्प उद्‌वस्थ होऊ देऊ नये, अशी सरकारला कळकळीची विनंती आहे. 
- मतीन भोसले, संस्थापक, प्रश्नचिन्ह आश्रमशाळा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup साठी आज भारतीय संघाची घोषणा, कुणाला संधी, कोण बाहेर? 'या' पाच प्रश्नांची मिळणार उत्तरं...

BMC Elections: देशातील हिंदू 1992 पुन्हा घडवण्यासाठी तयार... BMC निवडणुकीपूर्वी धीरेंद्र शास्त्रींचं मुंबईत वक्तव्य! राजकीय अर्थ काय?

Pune Mumbai Journey : पुणे-मुंबई प्रवास आता ९० मिनिटांत! नवीन द्रुतगती मार्गाच्या ‘डीपीआर’ला मंजुरी

New Year Upday 2026: नवीन वर्षात 'या' खास उपायांचे शांतपणे करा पालन, वर्षभर आर्थिक समस्यांचा करावा लागणार नाही सामना

Latest Marathi News Live Update : नागपूर महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीची दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

SCROLL FOR NEXT