Students will not be admitted to the next class if they do not pay 
विदर्भ

अबब! हे तर गजब झालंय...शाळेत गेले नाही विद्यार्थी, तरी वसूल होतेय शुल्क

सकाळवृत्तसेवा

गडचिरोली : यंदा कोरोना या महामारीचे संकट आल्याने मार्च महिन्यात होळीनंतरच विद्यार्थ्यांची शाळा बंद झाली होती. त्यामुळे शाळा नाही, तर शुल्क नाही, हे साधे गणित असताना अनेक खासगी शाळा पालकांकडून मागील शैक्षणिक सत्रातील शुल्क वसूल केले जात आहे. मागचे पैसे न दिल्यास विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळणार नाही किंवा त्यांना पुस्तके मिळणार नाही, असे धमकीवजा इशारेही दिले जात असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.

त्यामुळे शिक्षण विभागाने या गैरप्रकारांकडे लक्ष देऊन, अशा खासगी शाळांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यात शिक्षण देणाऱ्या अनेक खासगी शाळा, कॉन्व्हेंट आहेत. यात शुल्क वार्षिक देण्याची किंवा दर तीन महिन्यांनी म्हणजे त्रैमासिक देण्याची सोय असते. मागील सत्रात मार्च, एप्रिल, मे असे शेवटचे तीन महिने शाळा बंदच होत्या. त्यामुळे शाळा संचालकांना अतिरिक्त खर्च आला नाही. शिवाय विद्यार्थी शाळेतच न गेल्याने त्यांना काहीच शिकवण्यात आले नाही.

आता नवे सत्र सुरू झाले असून अद्यापही विद्यार्थ्यांना शाळेत बसवण्यात आले नाही. पण, त्यापूर्वीच अनेक खासगी शाळांनी पालकांचे खिसे खाली करणे सुरू केले आहे. विद्यार्थी शाळेत ज्या कालावधीत शिकलेच नाहीत, त्या कालावधीतील शुल्कही घेतले जात आहे. आधी मागील शुल्क भरा मग पुढचा विचार करू, अशी तंबीही पालकांना दिली जात आहे. त्यामुळे अनेक पालकांनी असंतोष व्यक्त केला आहे. या समस्येकडे शिक्षण विभागाने लक्ष देऊन हा गैरकारभार त्वरित थांबवावा, अशी मागणी होत आहे.

फक्त घेण्याचेच काम करा

अनेक खासगी शाळांचे संचालक फक्त पैसे घेण्याचेच काम करीत आहेत. म्हणजे कोरोनाच्या सावटात विद्यार्थी शाळेत गेले नसतानाही पालकांकडून पैसे वसूल करण्यात येत आहेत. पण, त्याच कोरोनाचे कारण सांगून तोटा दाखवत शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पगार न देणे किंवा मोठ्या प्रमाणात पगार कपात करणे सुरू आहे. म्हणजे पालक व शिक्षक, कर्मचाऱ्यांवर अन्याय करून संचालक स्वत:चे उखळ पांढरे करून घेताना दिसून येत आहेत.

उपशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधा

असे प्रकार कुठल्या शाळेत होत असतील, तर या गंभीर प्रकाराची चौकशी मी स्वत: करीन. कोणत्याही पालकाची शाळेसंदर्भात काही तक्रार असल्यास त्यांनी उपशिक्षणाधिकारी उचे यांच्याशी संपर्क साधावा. पालकांना त्रास व विद्यार्थ्यांचे नुकसान कोणत्याही परिस्थितीत आम्ही होऊ देणार नाही.
आर. पी. निकम, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), गडचिरोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir News : राम मंदिर ध्वजारोहण सोहळ्यात प्रवेशासाठी 'गुप्त कोड'ची गरज! आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार

ज्याचा त्याचा विठ्ठल !

DMart Sale : नोव्हेंबर महिना सुरू होताच डीमार्टचा स्पेशल सेल सुरू; 70-80% पर्यंत डिस्काउंट ऑफर्स..सगळंकाही स्वस्त पाहा एका क्लिकवर

Numerology News : 'या' मूलांकाचे लोक कमी वर्षे जगतात..कितीही फिट अ‍ॅन फाइन असले तरी लवकर जग सोडतात, पाहा तुमचा मूलांक काय?

Venkateswara Temple : आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्‍वर मंदिरात चेंगराचेंगरी; नऊ भाविकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT