रिना ठाकूर 
विदर्भ

मार्केटिंग करून स्वतः उभारली कंपनी

सुषमा सावरकर

नागपूर : महिला पदोपदी येणाऱ्या संकटाशी दोन हात करीत कुटुंबासाठी खंबीरपणे उभी राहात असते. याचा प्रत्यय येतो तो परिस्थितीवर मात करीत कुटुंब व स्वमालकीची कंपनी उभारणाऱ्या रिना ठाकूर यांचे कष्ट पाहिल्यावर.
केवळ बारावीपर्यंत शिकलेल्या रिना यांचे वय 38 वर्षे आहे. कुटुंबात एक मुलगा व मुलगी, इंजीनिअर पती असा सुखी संसार असताना 2011 मध्ये अचानक हृदय विकाराच्या तीव्र झटक्‍याने त्यांचे पतीचे निधन झाले आणि कधी कुठलाही व्यवहार करण्यास घराबाहेर न पडलेल्या रिना यांना घरबाहेर निघणे भाग पडले. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास सुरुवातीला त्या नोकरी करू लागल्या. तुटपुंज्या मिळकतीवर कुटुंबाचा गाडा चालविणे शक्‍य नव्हते. नोकरी सोडून त्यांनी घरीच डीश वॉश, हॅन्ड वॉश, वॉशिंग पावडर, मसाले तयार करून विकण्यास सुरुवात केली. क्‍लिनिंग प्रॉडक्‍ट तयार करण्याचे छोटेसे प्रशिक्षण त्यांनी घेतले होते. त्याचाच फायदा त्यांना झाला. स्वत: तयार केलेल्या सहा बॉटल्स विकण्यास त्या घराबाहेर पडल्या. आपल्याला सहा नव्हे तर सहाशे बॉटल्स विकायच्या आहेत, हा निश्‍चिय त्यांनी केला होता. व्यवसाय वाढविण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. घरी येण्यास रात्री होणारा उशीर, मुलांची काळजी हे सारे सांभाळून त्यांनी व्यवसाय वाढवला.
तीन वर्षे कष्ट उपसल्यानंतर रिना यांनी श्री राधे गृहोद्योग ऍण्ड इंटरप्राइजेस नावाने स्वःची कंपनी स्थापन केली. आज त्यांच्या कंपनीतील डीश वॉश, हॅन्ड वॉश, वॉशिंग पावडर, मसाले, गुलाब जल आदी प्रॉडक्‍ट केवळ नागपूरमध्ये नव्हे तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आदी जिल्ह्यात विकले जातात. त्यांची मुलगी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून, मुलगा अकरावीला आहे. रीना यांच्या कंपनीमुळे सहा लोकांना रोजगार मिळाला आहे.
जिद्द आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर अशक्‍य असे काहीही नाही. आयुष्यात अनेक उतार-चढाव येत असतात. याचवेळी माणसे ओळखू येतात. येणाऱ्या प्रत्येक अडचणीला धैर्याने तोंड देत पुढे जा. मार्केटिंग करण्यास अनेक महिला घाबरतात. मात्र जे कठीण दिसतय त्यामागे यश लपलेलं असते.
-रिना सुधीर ठाकूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT