विदर्भ

परिस्थितीशी झुंज देत गणेश बनला वैज्ञानिक

धर्मेश चौधरी

तेल्हारा (जि. अकोला) : घरात अठरा विश्व दारिद्र्य, शिक्षणासाठी आवश्यक मार्गदर्शनाचा अभाव, शैक्षणिक साहित्य विकत घ्यायला पैसा नाही, तरीदेखील मनात उच्च शिक्षण घेण्याचा संकल्प आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी सुटीच्या दिवशी मोलमजुरी करुन मिळालेल्या पैशात परिस्थितीवर मात करून शिक्षण घेत बायलॉजी विषयात पीएचडी केली. वैज्ञानिक बनून अमेरिकेतील रिसर्च सेंटरपर्यंत पोहचून तालुक्यातील खेलदेशपांडे (पंचगव्हाण) येथील गणेश पानझाडे याने उत्तुंग भरारी घेत विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण येथील गणेश प्रभाकर पानझाडे याची परिस्थिती जेमतेम होती. बालपणापासूनच त्याला शिक्षणाची असलेली आवड आणि मनात उच्च शिक्षण घेण्याचा संकल्प होता.

सुटीच्या दिवशी शेतात जाऊन मोलमजुरी करायचे आणि मिळालेल्या पैशातून शैक्षणिक साहित्य विकत घ्यायचं. या परिस्थितीत दहावीपर्यंतचे शिक्षण गावात पूर्ण केले. नंतर अकोट येथे शिवाजी कॉलेजमधे बॅचलर ऑफ सायन्समध्ये प्रवेश घेऊन बायोइन्फर्मेटिक्समध्ये पदव्युत्तर पदवी केली. विद्यापीठातून ते प्रथम आले.

बीएससीची पदवी घेतली. त्यानंतर एमएससी करुन बायोटेक्नॉलॉजी संस्था वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन प्रयोग शाळेच्या परिषदेत वैज्ञानिकांची संपर्क साधून सरकारी निधी संशोधन प्रकल्पावर काम केले. सायन्समधील पीएचडी सुरू करण्यासाठी इस फेयर फेलोशिपने सन्मानित केले.

बायोइन्फॉर्मेटिक्समध्ये पीएचडी पदवी सुरू केले. नोव्हेंबर २०१८ मध्ये पीएचडी पूर्ण करून डिव्हीडंट ऑफ बायोलॉजी कॅन्सस स्टेट युनिव्हर्सिटी मॅनहॅटन कॅन्सस यूएसए येथे पोष्टडॉक्टराल शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत झाला आहे. या उत्तुंग भरारीमुळे गावातील विद्यार्थ्यांसमोर त्याने एक नवीन आदर्श ठेवला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लहानपणापासूनच मनात शिक्षण घेण्याची व काहीतरी करण्याची इच्छाशक्ती होती. दृढसंकल्प होता हा संकल्प पूर्ण करण्यासाठी मी स्वतःला वाहून घेतले. याचे फळ मला मिळाले असून, विद्यार्थ्यांनी जर मनात ठरविले संकल्प केला आणि त्या संकल्पानुसार अभ्यास केला तर विपरीत परिस्थितीत देखील यशाचे शिखर गाठता येते.
- गणेश पानझाडे, वैज्ञानिक, खेलदेशपांडे, ता.तेल्हारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT