success story of sanjay chaube from achalpur of amravati 
विदर्भ

शाळेचे विद्यार्थीच झाले मुख्याध्यापक, गणित विषयातही तज्ज्ञ

राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : व्यक्ती कितीही मोठा अथवा छोटा असो बालपण अन्‌ शाळेतील आठवणी सर्वांना आपसूकच आठवतात. ज्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवले त्याच शाळेचे मुख्याध्यापक झाल्याची आगळीवेगळी कहाणी निश्‍चितच भूषणावह अशीच राहते. अशीच कहाणी अचलपूर शहरातील गणित विषयांत तज्ज्ञ म्हणून ख्याती असलेले संजय चौबे यांची आहे.

संजय चौबे यांनी शहरातील सुबोध हायस्कूलमध्ये शिक्षणाचे धडे गिरवले, त्याच शाळेच्या मुख्याध्यापक पदाचे कर्तव्य बजावण्याचा त्यांना बहुमान मिळाला आहे. संजय चौबे यांनी पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण सुबोध शाळेत घेतले होते. त्यानंतर 1993 साली याच शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. 27 वर्षांपासून ते या शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करीत असून गणित विषयाचे ते तज्ज्ञ मानले जातात. अध्यापन करण्याबरोबरच शहरातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध उपक्रमांत त्यांचा प्रामुख्याने सहभाग असतो. विशेष म्हणजे आई शालिनी, वडील प्रभाकर चौबे यांनी हॉटेलचा व्यवसाय चालवीत संजय चौबे यांच्यासह इतर भावांचे शिक्षण पूर्ण केले. संजय चौबे यांनी बीएससी बीएड, डीसीएम शिक्षणशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली, तर चौबे यांच्या सहचारिणी स्वाती यादेखील बीएससी बीएड उच्चशिक्षित आहेत. आज ज्या शाळेत खडतर परिस्थितीचा सामना करीत शिक्षण पूर्ण केले, त्याच शाळेचे मुख्याध्यापक पद मिळाल्याने चौबे यांच्यासह कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

माझ्यासाठी आनंदाचा दिवस -

ज्या शाळेत शिकलो, त्याच शाळेचे मुख्याध्यापकपदी माझी निवड झाली. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस ठरला आहे. निश्‍चितपणे शालेय अभ्यासक्रमाबरोबरच वेगवेगळ्या स्पर्धा, उपक्रम राबवत शाळेची यशस्वी घोडदौड अशीच पुढे सुरू राहील, यासाठी मी प्रयत्न करेल.
- संजय चौबे, मुख्याध्यापक, सुबोध हायस्कूल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT