Varsha 
विदर्भ

अशी आहे शेतकरी कन्येची यशोगाथा! एकाच वर्षी राज्य सेवा आयोगाच्या दोन परीक्षा उत्तीर्ण

बालकदास मोटघरे

आनंदवन(जि. चंद्रपूर) : प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे, हे शब्दश: खरे असल्याचे एका शेतकरी कन्येने सिद्ध करून दाखविले. मनात जिद्द असली आणि परीश्रम करण्याची तयारी असली तर यश दूर नसते. हेच तिच्या कहाणीवरून कळते. कुटुंबावर आलेल्या संकटात आई हिंमतीने उभी राहिली. तिने कुटुंब सांभाळले. सांभाळले नाही तर माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला. त्यामुळेच मला यश संपादन करता आले, अशी भावना वर्षा शेडमे हिने व्यक्त केला. राज्य सेवा आयोगाच्या कर सहाय्यक परीक्षेत राज्यात मुलींमध्ये वर्षा तिसरी आली आहे. एकाच वर्षी राज्य सेवा आयोगाच्या दोन परीक्षेत तिने यश मिळविले.

चिमूर तालुक्‍यातील तुकुम या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबातील वर्षा शेडमे. प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. घरची परिस्थिती साधारण. मात्र वडिलांची प्रकृतीची नेहमीच समस्या असायची. त्यात वडिलांचा अपघात झाला. एक पायाला अपंगत्व आले. शेतीची आणि कुटुंबाची जबाबदारी आईवर आली. आईने मला व आमच्या कुटुंबाला खचू दिले नाही. माझ्यात आत्मविश्वास पेरला. अभ्यास करताना माझ्या समोर फक्त आई दिसायची. तिने उपसलेले कष्ट दिसायचे. त्या कष्टाचे चीज व्हावे, म्हणून मी दिवसरात्र अभ्यास केला, असे वर्षा सांगते.
परिस्थिती माणसाला संघर्ष करायला शिकविते. परिस्थितीशी दोन हात करीत वर्षाने एकाच वर्षी राज्य सेवा आयोगाच्या दोन परीक्षा उत्तीर्ण केल्या. पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत ती मुलींमध्ये 47 व्या स्थानावर आली. सहाय्यक कर निरीक्षक परीक्षेत 132 मार्कस घेत मुलींमध्ये राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

सविस्तर वाचा -  उपराजधानीत पावसाची जोरदार "बॅटिंग'

वर्षाने आपले पदवीचे शिक्षण वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालयात घेतले. तिथल्या प्राध्यापकांनी तिला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला दिला. काही दिवस ज्ञानदा येथील ग्रंथालयात अभ्यास केला. पुढे जळगाव येथे "दीपस्तंभ' ला जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी केली. एकाच वर्षी राज्य सेवा आयोगाच्या दोन परीक्षा उत्तीर्ण करण्याची कमाल केली.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT