file photo
file photo 
विदर्भ

पत्नीपासून विभक्त पतीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वाडी पोलिसठाण्यांतर्गत येणाऱ्या नवनीतनगरमधील एका व्यक्‍तीने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तीन दिवसांनंतर उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती
दिली आणि हा प्रकार उघडकीस आला. बबन हिरामन वाळवे, असे मृताचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनीतनगर म्हाडा कॉलनी रहिवासी बबन हिरामन वाळवे (42) हे परिवार सोडून गेल्या 5 वर्षांपासून एकटेच राहत होते. पतीसोबत पटत नसल्याने त्यांची पत्नी मुलीला घेऊन वेगळी एकटीच राहत होती. बबन एकटेच राहत असल्याने चिंताग्रस्त असायचे. त्यातूनच त्यांना दारूचे व्यसनही लागले होते. बबन वाळवे यांनी त्यांच्या राहत्या घरी रविवारी गळपास लावून आत्महत्या केली. या आत्महत्येची माहिती बुधवारी सकाळी शेजाऱ्यांना कळली. घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे जाणून घेण्यासाठी त्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला. पण, घराचे तीनही दरवाजे आतून बंद होते. त्यांनी या घटनेची माहिती कंट्रोलरूम व बबन वाळवे यांचे लहान भाऊ डिफेन्स निवासी किशोर वाळवे यांना दिली. वाडी पोलिस घटनास्थळी पोहोचून घराचा दरवाजा उघडला, तेव्हा बबन वाळवेगळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो पोस्टमार्टेमसाठी मेयो हॉस्पिटलला रवाना केला. पोलिसांनी तूर्तत: आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT