Suicide of young farmer due to debt sakal
विदर्भ

कर्जाचा चढता डोंगरमुळे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

शेतातील झाडालाच दोराने गळफास लावून आत्महत्या केली

सकाळ वृत्तसेवा

पवनार : कर्जाचा चढता डोंगर, दिल्या वेळेत पैसे परत न करता आल्याने आत्मसन्मानाशी लागलेल्या कसोटीत त्या शेतकऱ्याला आयुष्य थिटे वाटले. त्याने शेतातील झाडालाच दोराने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सेलू तालुक्यातील वाहितपूर शेतशिवारात सोमवारी (ता. नऊ) उघडकीस आली. आशिष महादेव भट (वय ३०, रा. पवनार) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आशिष भट यांची वाहितपूर शेतशिवारात शेती आहे. शेतात उन्हाळी पीक असल्याने शेत ओलितासाठी जात असल्याचे कुटुंबियाला सांगून आशिष रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास निघाला होता. परंतु, सकाळी उशीर होऊनही आशिष घरी न परल्याने कुटुंबियानी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. कासावीस झालेल्या भट कुटुंबांनी घडलेला घटनाक्रम आशिषच्या मित्रांना सांगीतला. त्याच्या मित्रांनी शेतशिवारात पाहणी केली असता शेतातील झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आशिषचा मृतावस्थेत मृतदेह आढळून आला.

या घटनेची माहिती सेलू पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली. वाढत्या कर्जाचा डोंगर चढत असल्याने ही आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. मृत्यूमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पूढील तपास सेलू पोलिस करीत आहे.

स्वतःशीच आत्मसन्मानाची कसोटी

आशिष हा कष्टाळू स्वभावाचा. त्याची वाहितपूर शेतशिवारात तीन एकर शेती आहे. मेहनती असल्याने त्याने शेताजवळ लागून असलेली जमीन भाडेतत्त्वावर मक्त्याने घेतली होती. त्यावरच आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले असा संसाराचा गाडा हाकत होता. शेतीला लागणारा खर्च वाढत गेल्याने त्याने काही गटाचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाचा वेळेत भरणा करता न आल्याने त्याची स्वतःशीच आत्मसन्मानाची कसोटी सुरू झाली. या कसोटीत त्याला त्याला आयुष्य थिटे वाटू लागल्याने आत्महत्येचा पर्याय निवडला. कर्जाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT