Suicide of a project affected girl from Vekoli in Amravati 
विदर्भ

कुटुंबीयांनी मुलीचा मृतदेह वेकोलिच्या कार्यालयासमोर आणून ठेवला; अपमानास्पद वागणूक आणि मानसिक त्रास

सकाळ वृत्तसेवा

राजुरा (जि. चंद्रपूर) : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पोवनी-३ कोळसा खाणीतील प्रकल्पग्रस्त १९ वर्षीय युवतीने आत्महत्या केली. नोकरीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी वेकोलि प्रशासनाने त्रास दिला. त्याच नैराश्‍यातून तिने आत्महत्या केली, असा आरोप वडिलांनी केला. आशा तुळशीराम घटे (रा. सास्ती) असे मृताचे नाव आहे. वेकोलिच्या महाप्रबंधक कार्यालयासमोर मृतदेह ठेवून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली.

राजुरा तालुक्‍यातील साखरी येथील तुळशीराम घटे यांची शेतजमीन वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पोवनी-३ कोळसा खाणीसाठी अधिग्रहित करण्यात आली. तुळशीराम घटे यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे. वेकोलित शेतजमीन गेल्यामुळे मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करीत होते. शेतजमिनीच्या अधिग्रहणाचा मोबदला मिळाला. मात्र, नोकरीसाठी अनेक दिवसांपासून वेकोलि प्रशासन विविध कागदपत्रांसाठी तगादा लावून त्रास देत होते.

वडिलांचे वय जास्त असल्याने मुलीला नोकरी देण्यासाठी आवश्‍यक कागदपत्र वेकोलि प्रशासनाकडे सादर केली. परंतु, नोकरी देण्यास टाळाटाळ केली जात होती. दरम्यान, २२ मार्च रोजी वेकोलिचे क्षेत्रीय योजना अधिकारी जी. पुलीया यांनी घटे कुटुंबीयांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कार्यालयात बोलविले. संपूर्ण कुटुंब कार्यालयात गेले असता कागदपत्रांच्या पूर्ततेसंबंधी विचारणा करण्यापेक्षा कुटुंबातील वैयक्तिक प्रश्नावरून मुलीला विचारणा करून अनावश्‍यक त्रास दिला. अपमानास्पद वागणूक देऊन घरी परत पाठविले.

वेकोलि प्रशासनाच्या अशा कारणामुळे कुटुंबाला मोठा मानसिक त्रास सुरू होता. यातच मुलीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. २३ मार्चला मुलीची प्रकृती बिघडल्याने स्थानिक रुग्णालयात उपचार केले. परंतु, प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे २७ मार्च रोजी चंद्रपूर येथे उपचारार्थ दाखल केले.

मात्र, बुधवारी तिचा मृत्यू झाला. आत्महत्येला वेकोलि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत कुटुंबीयांनी मुलीचा मृतदेह वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राच्या महाप्रबंधक कार्यालयासमोर आणून ठेवला. क्षेत्रीय योजना अधिकारी जी. पुलीया हेच मृत्यूस जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Return : आयकर विभागाचा करदात्यांना इशारा! 31 डिसेंबरनंतर थेट 5,000 दंड; ITR मध्ये चूक असेल तर आत्ताच हे करा

Latest Marathi News Live Update : मूदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

Tulsi Puajn Diwas 2025: आज तुळशी पूजनाचा खास दिवस! ‘हे’ उपाय केल्यास घरात नांदेल सुख-समृद्धी

Satara Crime: इन्स्टाग्रामवरील मैत्री आली अंगलट! कास पठार फिरवण्याच्या बहाण्याने बोलवलं अन् नंतर असं काही घडलं की...

Viral Memes : कोल्ड प्ले किस, महाकुंभ मोनालीसा ते इंडियन बजेटपर्यंत...2025 वर्षांत व्हायरल झाले टॉप 10 मिम्स, हसून हसून पोट दुखेल

SCROLL FOR NEXT