विदर्भ

चार शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

सकाळवृत्तसेवा
गोरेगाव (जि. गोंदिया) - पांदण रस्त्याच्या बांधकामात दिशाभूल केल्याचा आरोप करून चार त्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून तसेच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज, शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घडली. या प्रकाराची माहिती होताच पाच ते सहा शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर संबधितांवर कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्‍त जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.

गोरेगाव तालुक्‍यातील बघोली येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पांदण रस्त्याची कामे सुरू आहेत. रस्ता बांधकामात रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांची दिशाभूल करून पांदण रस्ता तयार करण्यात आल्याची तक्रार शेतकरी रूपचंद पटले, नारायण चन्ने व इतरांनी केली होती. त्या तक्रारीच्या आधारे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार कारवाई न झाल्याचा मुद्दा समोर करीत आज, शनिवारी बघोली येथील शेतकरी रूपचंद पटले, नारायण चन्ने व इतर तीन ते चार जणांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून व विषप्राशन करून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेचे सभापती पी. जी. कटरे यांना माहिती मिळताच त्यांनी त्या शेतकऱ्यांकडे धाव घेतली. संबंधित शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून निवासी उपजिल्हाधिकारी, मग्रारोहयो उपजिल्हाधिकारी व उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत विभाग यांना बोलावून चर्चा घडवून आणली. तेव्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी 19 मे रोजीच या प्रकरणाची पुन्हा सखोल चौकशी करण्यासोबतच 26 मे रोजीच्या ग्रामसभेत ग्रामरोजगार सेवकाला हटविण्याबाबत ठराव घेण्याच्या सूचना तसेच त्याच्यावर पोलिस कारवाई करण्यासंबंधी गटविकास अधिकारी, पंचायत समिती गोरेगाव यांना निर्देश दिले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी दिली. यानंतर शेतकरी शांत झाले. सभापती कटरे यांनी यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एच. ठाकरे यांच्यासोबत संबंधित शेतकरी यांची बैठक घेऊन गोरेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यासह ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवकाची चौकशी करण्यासंबंधी चर्चा केली. यावेळी जि. प. अध्यक्ष उषा मेंढे, उपमुकाअ राजेश बागळे, श्री. भेंडारकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, तर सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT