file photo
file photo 
विदर्भ

विवाहसोहळ्यातून "त्या' शेतकरी कुटुंबांना मिळाला आधार 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : आजच्या काळातील संपन्न कुटुंबातील विवाह सोहळा म्हणजे अनेकांचे डोळे दीपवणारा असतो. जितका जास्त खर्चिक सोहळा तेवढी त्या समारंभाची चर्चा होत असते; मात्र विवाह सोहळ्यातूनही सामाजिक जाणिवेचा ओलावा जपणारे व्यक्‍ती बोटांवर मोजण्याइतकेच दिसून येतात. अमरावतीच्या मोंढे कुटुंबाकडून शनिवारी (ता. 18) आयोजित विवाहसोहळ्यात अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. 

विश्‍व हिंदू परिषदेचे विशेष जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. अरुण मोंढे तसेच डॉ. माया मोंढे यांची मुलगी दर्शना हिचा विवाह क्षितीज देशमुख यांच्याशी वलगाव येथील सिकची लॉनवर पार पडला. आज शेतकरी संकटातून जात आहेत, आत्महत्येच्या संख्येत वाढ होत आहे. डोक्‍यावर कर्जाचा डोंगर, त्यातच कुटुंबाची उपजीविका कशी भागवावी, असा प्रश्‍न उभा ठाकला आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला काही प्रमाणात का होईना मदतीचा हात देण्याचा निर्णय मोंढे कुटुंबीयांनी घेतला. 

आदिवासी बांधवांसाठी आरोग्य शिबिर 

विविध सामाजिक कार्यांसह मेळघाटातील दुर्गम भागात जाऊन आदिवासी बांधवांसाठी अनेक आरोग्य शिबिरांचे आयोजन करणाऱ्या डॉ. अरुण मोंढे तसेच डॉ. माया मोढे यांनी विवाहसोहळ्यात लाखो रुपयांची उधळपट्टी टाळत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत दिली. त्यामुळे समाजासमोर एक आदर्श प्रस्थापित केला. जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांचेसुद्धा या उपक्रमाला सहकार्य लाभले. 

धनादेशासोबतच साडी-चोळीचा अहेर 

विशेष म्हणजे लग्नमंडपी "पर्यावरण संवर्धन तसेच मुलगी वाचवा' या आशयाचे संदेश देणारे फलक लावून मोंढे कुटुंबाने जनजागृती केली. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुुटुंबातील गणेश आवारे व छबू आवारे, नंदा बोबडे, रेखा खरे, अन्नपूर्णा बोबडे, मंदा किलोर, बेबी शिरस्कर, पार्वती सोनोने, मंगला ठाकरे आदींना मदतीच्या धनादेशासोबतच साडी चोळीचा अहेरसुद्धा या विवाहसोहळ्यात करण्यात आला. 

 असे का घडले? : लग्न होऊन झाले सहाच महिने अन्‌ पत्नीने दाखवले 'रूप', मग पतीने घेतला हा निर्णय

एक सामाजिक उपक्रमच 

त्यामुळे हा सोहळा म्हणजे एक सामाजिक उपक्रमच बनला होता. यावेळी मोंढे कुटुंबातील सदस्य केंद्र सरकारमधील सनदी अधिकारी प्रवीण गेडाम, जिल्हापरिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 

समाजाने समोर यावे 
आज शेतकरी बिकट परिस्थितीतून जात आहे. त्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. या विवाहसोहळ्याच्या माध्यमातून आम्ही केलेली अल्प मदतसुद्धा त्यांच्या काही कामी येऊ शकते, याचे समाधान आहे. समाजानेसुद्धा आपल्या परीने शेतकरी कुटुंबाना मदत करण्याची खरी गरज आहे. 
- डॉ. अरुण मोंढे (वधूपिता) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईला आव्हान देण्यासाठी पंजाब सज्ज; आत्तापर्यंत कोणाचं पारडं राहिलंय जड

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

SCROLL FOR NEXT