Is the Supreme Court in the hands of Fadnavis 
विदर्भ

विजय वडेट्टीवार यांच ‘एक तीर दो निशान’; उदयनराजेंच्या निमित्ताने फडणवीसांना हाणला टोला

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी मोठे विधान केले होते. ‘फडणवीसांच्या हातात सत्ता द्या, मी तुम्हाला आरक्षण देतो’ असे ते म्हणाले होते. आता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समोर करून उदयनराजे भोसलेंवर चांगलेच बरसले. ‘आरक्षण द्यायला सुप्रीम कोर्ट काय फडणवीस यांच्या हातात आहे का’ असा प्रश्‍न वडेट्टीवारांनी उदयनराजेंना उद्देशून केल्याने फडणवीस काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील सर्व जातींना एकत्र करताना थोडा समन्वयाचा अभाव होऊ शकतो. मी मंत्री जरी असलो तरी मंत्रिपद हे औट घटकेचे आहे. मला ओबीसींच्या हक्कासाठी लढावे लागेल, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीला विधान परिषद निवडणुकीत मिळालेला कौल म्हणजेच महाविकास आघाडी सरकारने वर्षभरात केलेल्या चांगल्या कामांवर मतदारांनी शिक्का मारला आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय सेवा संघाचा ५८ वर्षांपासून असलेला गड आम्ही उद्ध्वस्त केला आहे. मंत्रीपद गेले तरी बेहत्तर, पण मी ओबीसींसोबतच आहे, होतो आणि राहणार आहे. आरक्षणच्या मागणीसाठी आम्ही संपूर्ण ताकतीनीशी मराठा समाजासोबत आहोत, पण ओबीसींमधून आरक्षणाची मागणी करणे सर्वार्थाने चुकीचे आहे. न्यायातून बाजूला कधीही हटणार नाही.

तो वाद आता मिटला

राज्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ओबीसींच्या साथीमुळे महाविकास आघाडीला चांगले यश मिळविले आहे. औरंगाबादमधील मेळाव्यात गैरसमजुतीतून वाद झाला होता. तो वाद आता मिटला आहे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT