file photo
file photo 
विदर्भ

अवैध सावकाराचा कर्जवसुलीसाठी तगादा

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : सावकाराने कर्जवसुलीसाठी तगादा लावून चारचाकी वाहन उचलून नेले. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन जगणे असहाय्य केल्याची तक्रार लाखनी पोलिसांनी दाखल केली आहे.
जिल्ह्यात अधिक व्याज दराने कर्जावू रक्कम देणारे अवैध सावकार गावागावात आहेत. ते बॅंकांनी ठरविलेल्या दरापेक्षा कितीतरी अधिक दराने व्याज आकारणी करतात. त्यामुळे मुद्दल व व्याजाची सहज परतफेड होत नाही. असे अवैध सावकार कष्टकऱ्यांचे नियमित शोषण करतात. मात्र, त्याबाबत कोणीही तक्रार करत नसल्याने सावकारांच्या विरोधात कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे सावकार निर्ढावले आहेत.
मुरमाडी सावरी येथील शारदा रेवाजी फटे व लितेश रेवाजी फटे यांचा अवैध सावकारीचा व्यवसाय सुरू आहे. त्यांनी बेहळा मानेगाव येथील मंजू तुळशिराम डुंबरे यांना फेब्रुवारी महिन्यात 15 टक्के व्याजदराने 90 हजार रुपये कर्जावू दिले होते. मात्र, ठरल्याप्रमाणे वेळेत कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे सावकाराने महिला व तिच्या पतीला सार्वजनिक ठिकाणी अश्‍लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांचे चारचाकी वाहन (एमएच 36/झेड 0274) ताब्यात घेऊन आपल्या घरी नेले. कर्जाची परतफेड करत नाही, तोपर्यंत वाहन आपल्या ताब्यात राहील, असे सांगितले. मात्र, तेव्हापासून सतत जिवे मारण्याची धमकी देत कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याने जगणे असहाय्य झाल्याची तक्रार मंजू डुंबरे यांनी लाखनी पोलिसांत केली. पोलिसांनी सावकारी अधिनियमानुसार मायलेकांवर गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT