death in lake
death in lake death in lake
विदर्भ

Rest in peace : त्याने स्वतःलाच वाहिली श्रद्धांजली; आत्महत्येचा संशय

सकाळ वृत्तसेवा

तुमसर (जि. भंडारा) : शहर वॉर्डातील अनुराग विजय गायधने (वय १७) या विद्यार्थ्याने आयटीआयच्या परीक्षेत नापास झाल्याचे मनावर घेऊन रविवारी (ता. २०) पहाटे माडगी पुलावरून उडी घेतल्याची चर्चा आहे. अनुरागने व्हॉट्सॲपवर ‘रेस्ट इन पीस’ असे स्टेटस ठेवून स्वतःलाच श्रद्धांजली वाहिली. त्याने आत्महत्या केल्याचा संशय (Suspicion of suicide) असल्याने वैनगंगेच्या पात्रात शोधकार्य सुरू करण्यात आले. मात्र, सात तासांनंतरही अनुराग सापडला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय व्यवसाय शिक्षण परीक्षा-२०२२ चा निकाल १९ फेब्रुवारीला घोषित करण्यात आला. हा निकाल अनुरागने मोबाईलवरून बघितला. तो बजाजनगरातील न्यू तुलसी खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वीजतंत्री अभ्यासक्रमाचा विद्यार्थी होता. अनुराग प्रात्यक्षिक परीक्षेत नापास झाला. त्याचे मनावर दडपण घेऊन तो आज पहाटे घरून सायकलने निघून गेला. माहिती मिळताच नातेवाईक आणि देव्हाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सकाळपासून नदीपात्रात शोधकार्य सुरू आहे. पाण्याची पातळी खोल असल्याने सात तास लोटूनही अनुरागचा थांगपत्ता लागलेला नाही.

माय लास्ट लोकेशन इज माडगी ब्रीज

अनुरागने सकाळी सव्वासहा वाजता व्हॉट्सॲपवर फोटोसह ‘माय लास्ट लोकेशन इज माडगी ब्रीज’ असे भावनिक स्टेटस अपलोड केले. त्यानंतर पुलावर त्याची सायकल व अंगावरील जॅकेट आढळून आले. जीवनयात्रा संपविण्याआधी (Suspicion of suicide) अनुरागने फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर स्वतःच स्वतःला श्रद्धांजली वाहिली आहे. आमिर खानच्या ‘थ्री इडिएट्स’ सिनेमातील ‘बहती हवासा था वो’ असे स्टेटस माझ्याकरिताही सर्व ठेवतील, असे लिहून त्याने स्वतःला ‘रेस्ट इन पीस’ अशी श्रद्धांजली वाहिली आहे.

वैनगंगेच्या पात्रात शोधकार्य सुरू आहे. मात्र, अद्याप अनुरागचा मृतदेह आढळून आलेला नाही.
- गभणे, पीएसआय, पोलिस चौकी, देव्हाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT