The sword runs in the khamgaon; All three were injured 
विदर्भ

Video : रस्त्याचा वाद गेला विकोपाला... चक्क तलवार व लोखंडी पाईपने केला हल्ला

सकाळ वृत्तसेवा

खामगाव : मस्‍जिदचा रस्‍ता वापरण्याच्‍या कारणावरून एकाच समाजाच्‍या दोन कुटुंबामध्ये वाद निर्माण होवून वादाचे पर्यावरसन हाणामारीत झाले. यावेळी तलवारीने वार करून तिघांना जखमी केल्‍याची घटना येथील एकतानगरात घडली.

नाजीया परवीन मो. फिरोज (वय 28) रा. एकतानगर या विवाहितेने शहर पोस्‍टेला तक्रार दिली की, 14 मार्च रोजी ती पती आणि मुलींसह घरामध्ये हजर असताना शेजारी राहणारे आबीद अली गुलाम अली त्‍यांची मुले आजम अली व अशरफ अली आणि मुलगी शहजादी सहेर हे चौघे घरासमोर आले व मस्‍जिदचा रस्‍ता वापरण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून विवाहिता आणि पतीला मारहाण केली. याबाबत शहर पोस्‍टेला तक्रार देण्यासाठी गेले असता समाजातील ज्‍येष्ठ नागरिकांनी समजूत घालून प्रकरण मिटविले.

नंतर भांडणाची माहिती विवाहितेचा अकोला येथे राहणारा भाऊ मो. शोएब रा. जिरा बावडी याला मिळाली असता तो त्‍याच्‍या तीन मित्रांसह अकोला येथून तिच्‍या घरी आला. यावेळी उपरोक्‍त चौघांनी विवाहितेच्‍या भावाला आणि त्‍याच्‍या मित्रांना पाहून पुन्‍हा वाद निर्माण केला आणि आजम अली याने तिच्‍या भावाला तलवारीने खांद्यावर वार करून जखमी केले. तसेच इतरांनी विवाहिता आणि तिच्‍या पतीला लोखंडी पाईप व गजाने मारहाण करून जखमी केले. या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्‍त चौघांविरुध्द गुन्‍हा दाखल केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT