विदर्भ

रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; देवेंद्र फडणवीसांचे पोलिस महासंचालकांना पत्र

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : अमरावतीत रेमडेसिव्हिरचा (Remdesivir) काळाबाजार प्रकरणात ज्यांना अटक झाली त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पोलिस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pande) यांच्याकडे केली आहे. (take action against Remdesivir black market fadanvis wrote letter to DGP)

अमरावती येथे उघडकीस आलेल्या रेमडेसिव्हिरच्या काळाबाजार प्रकरणात गुन्हा दाखल होऊन अटक झालेल्यांपैकी पाच व्यक्ती या शासकीय रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या आहेत, त्यापैकी दोन तर वैद्यकीय अधिकारी अशा वरिष्ठ पदांवर काम करणारे आहेत. त्यामुळे याप्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. असे असताना अटक झाल्यानंतर त्यांची साधी पोलिस कोठडीसुद्धा मागितली जाऊ नये, ही अतिशय गंभीर बाब असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

रेमडेसिव्हिरचा पुरवठा हा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत थेट रुग्णालयांना केला जातो. त्यामुळे कुठलीही खासगी व्यक्ती रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन वितरित करू शकत नाही. असे असतानाही शासकीय यंत्रणेतूनच हे काळाबाजारीचे रॅकेट चालत असेल तर याप्रकरणाची अतिशय सखोल चौकशी होणे नितांत गरजेचे आहे. असेही त्यांनी पोलिस महासंचालकांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

संकटाच्या काळात अनेक रुग्ण औषधाविना तडफडत आहेत. अशात त्याच औषधांचा काळाबाजार घातक असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत चिंता व्यक्त केली. याप्रकरणातील दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालकांना केली आहे.

(take action against Remdesivir black market fadanvis wrote letter to DGP)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT