file photo
file photo 
विदर्भ

इंधन दरवाढ त्वरित मागे घ्या : कॉंग्रेस

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : पेट्रोल-डिझेलची दरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी, "मॉबलिंचिंग'च्या घटनांना आळा घालण्यासाठी कायदा तयार करण्यात यावा तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी शहर कॉंग्रेसतर्फे बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून करण्यात आली.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवर प्रतिलिटर 2.50 रुपये वाढ केली. या दरवाढीच्या माध्यमातून आर्थिक लूट केली जात आहे. त्याचा फटका उद्योग, लघुउद्योगाला बसून वाहतूक महागणार आहे. 1 जुलै 2017 ला पेट्रोल 63 रुपये तर डिझेल प्रतिलिटर 58 रुपये होते. आता पेट्रोल 79.76 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 70.96 रुपये प्रतिलिटर आहे. दोन वर्षांत पेट्रोल 17 रुपयांनी तर डिझेल 13 रुपयांनी वाढले आहे, असे सांगत ही दरवाढ मागे घेण्याची मागणी कॉंग्रेसने केली.
देशात मॉबलिंचिंगच्या घटना सतत घडत आहे. यावर आळा घालण्यासाठी प्रभावी कायदा तयार करण्यात यावा. शहरात भररस्त्यात महाविद्यालयीन तरुणीचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना अत्यंत दुर्देवी असून त्याबाबत तातडीने पावले उचलण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT