sand on road 
विदर्भ

तलाठ्याने विचारणा करताच, रेती चोरट्यांनी काढला पळ!

सकाळ वृत्तसेवा

शेगाव (जि.बुलडाणा) : ट्रॅक्टरने रेती वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची तलाठ्याने चौकशी करताच ट्रॅक्टर चालकांनी हायड्रोलीकच्या ट्रॉलीमधील रेती रस्त्यावर खाली करून पळ काढल्याची घटना 17 जानेवारी रोजी रात्री 10.15 वाजता सुमारास भोनगाव शिवारात घडली.

चोरीची रेती टाकली रस्त्यावर
तलाठी मो.जावेद शे.दौलत (वय 54) यांनी ग्रामीण पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार रात्रीच्यावेळी ते भोनगाव शिवारात ड्युटीवर असताना रात्री 10.15 वाजता सुमारास त्यांना रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर दिसले. वाहने थांबवून त्या ट्रॅक्टरच्या चालकांना तलाठी मो.जावेद यांनी विचारपूस केली असता टॅक्टर चालकांनी हायड्रोलिक ट्रॉलीमध्ये असलेली दीड ब्रास चोरीची रेती रस्त्यावर खाली करून पळ काढला.

...तर एक ट्रॅक्टर चालक वाशीमचा
तलाठी मो.जावेद यांनी ट्रॅक्टरचे क्रमांक टिपले असून, एम. एच. टी 6792 या ट्रॅक्टरच्या चालकाने रामदास पुंजाजी इडोळे रा.दोडकी ता.जि.वाशीम अशी ओळख दिली आहे. तर वाहन क्रमांक एम. एच. 28 बीबी 7200 वाहनावरील चालकाने नाव न सांगता पळ काढल्याचे तलाठी मो.जावेद यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी मोवाकानुसार या ट्रॅक्टरच्या चालकांविरूध्द गुन्हा दाखल केला असून, घटनेचा तपास पीएसआय अरविंद तुंबळे यांच्याकडे देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT