Talathi Bharti 2023 esakal
विदर्भ

Talathi Bharti 2023: तलाठी पदभरतीला तत्काळ स्थगिती देण्यात यावी; राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकार्‍यांची मागणी

सकाळ डिजिटल टीम

गडचिरोली: जिल्ह्यात तलाठी संवर्गातील पदे भरताना २०१४ च्या राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार १५८ पैकी पेसा क्षेत्रातून १५१ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे.

म्हणून या पदभरती प्रक्रियेला तत्काळ स्थगिती देऊन २८ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार तलाठी पद भरती प्रक्रिया राबवावी व ओबीसीवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तलाठी भरती प्रक्रियेमध्ये ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. याकरिता आपण शासनस्तरावर पाठपुरावा करू, असे आश्वासन आमदार डॉ. देवराव होळी यांनी यावेळी निवेदकांना दिले.

निवेदन देताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, कार्याध्यक्ष विनायक बांदूरकर, जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, जिल्हा संघटक सुरेश भांडेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे.

माजी उपसभापती विलास दशमुखे यांच्यासह ओबीसी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार डॉ. होळी यांनी निवेदकांचे म्हणणे ऐकून घेत भरती प्रक्रियेला तातडीने स्थगिती देऊन २८ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार पद भरतीची प्रक्रिया राबविण्यासंदर्भात आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेसाठी गोपीचंद पडळकर मैदानात, जयंत पाटलांविरोधात फुकले रणशिंग

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT