file photo 
विदर्भ

गडचिरोलीत महिला तलाठ्याचा प्रताप...कमीशन घेतल्याने झाले निलंबन

सकाळ वृत्तसेवा

एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्‍यातील तलाठी साजा जारावंडी येथील महिला तलाठी किरण वलके या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दुष्काळ निधीच्या रकमेतून कमीशन मागत होत्या. श्रावणबाळ व वृद्धापकाळ योजनेचा लाभ मिळवून देण्यास विधवा महिला व वृद्ध नागरिकांना दहा हजार रुपयांची मागणी करीत असल्याची नागरिकांची तक्रार होती.

ही तक्रार सरखेडा गावातील 30 शेतकरी व नागरिकांनी केल्यामुळे उपविभागीय अधिकारी मनुज जिंदल यांनी किरण वलके यांच्यावर 30 मार्च रोजी निलंबनाची कार्यवाही केली आहे.

अतिवृष्टीने धानपिकांचे नुकसान

चालू शेती हंगामात अतिवृष्टी झाल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या धानपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनस्तरावरून पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ देण्यात आला. या दुष्काळ निधीची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली गेली आहे.

योजनेचा लाभ मिळणार नाही

जारावंडी तलाठी साजा आदिवासीबहुल, अतिदुर्गम छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आहे. या साजातील सरखेडा गावातील शेतकऱ्यांना तलाठी वलके यांनी जारावंडी येथे बोलावून घेतले. तुमच्या बॅंक खात्यात जमा दुष्काळ निधीतील 40 टक्‍के रक्कम मला काढून द्या; अन्यथा तुम्हाला यापुढे कोणत्याही योजनेचा फायदा मिळणार नाही, असी धमकी दिली.

अखेर झाली निलंबनाची कारवाई

तलाठी वलके या स्वतः शेतकरी, वृद्ध व विधवा महिलांच्या बॅंक खात्याचा विड्राल भरून त्यांच्यासोबत बॅंकेत जाऊन रक्कम प्राप्त करून घेत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे तलाठी वलके यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईचा विकास रखडला? बीएमसी बजेटपैकी ४८% निधी अजूनही प्रलंबित, खर्चाचे आकडे समोर

Viral Video: धक्कादायक! आईनं १०व्या मजल्याच्या बाल्कनीतून मुलाला लटकवलं; वेगळंच कारण समोर, पाहा व्हायरल व्हिडिओ

Mumbai: रस्ते आणि पुलांना नवी ओळख मिळणार! मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची नावे बदलणार; पण कोणत्या? जाणून घ्या यादी...

Rohit Pawar: ''..तोपर्यंत मी शर्टचं वरचं बटण लावणार नाही'', विधानसभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

Dhule News : दोंडाईचा पोलिसांची मोठी कामगिरी! वर्णेश्वर महादेव मंदिरातील चोरीचा २४ तासांत छडा

SCROLL FOR NEXT