Bribe sakal
विदर्भ

१५ हजारांची लाच स्वीकारताना तलाठ्याला रंगेहाथ अटक

वाहतूकदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील तलाठ्याला रंगेहाथ पकडून अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

वाहतूकदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील तलाठ्याला रंगेहाथ पकडून अटक केली.

गडचिरोली - गिट्टीची वाहतूक करताना जप्त केलेले टिप्पर व ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी तसेच पुन्हा नियमित वाहतूक करू देण्यासाठी एका वाहतूकदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवार (ता. १३) कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील तलाठी नरेंद्र रामचंद्र ठाकरे (वय ४४) यास रंगेहाथ पकडून अटक केली.

प्राप्त माहितीनुसार, तक्रारकर्ता ट्रॅक्टर आणि टिप्परद्वारे गिट्टीची वाहतूक करतो. १० ऑक्टोबरला वाहतुकीदरम्यान त्रुटी आढळल्याने तलाठी नरेंद्र ठाकरे याने टिप्पर पकडून नंतर तो सोडून दिला. परंतु टिप्पर सोडण्याचा मोबदला म्हणून १० हजार आणि बेतकाठी साजाच्या हद्दीतील खाणीतून नियमित गिट्टी वाहतूक करू देण्यासाठी दरमहा १० हजार अशी २० हजार रुपयांची लाच तलाठी ठाकरे याने तक्रारकर्त्यास मागितली.

तडजोडीअंती तो १५ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला. परंतु लाच देण्याची तक्रारकर्त्यांची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार गुरुवारी संध्याकाळी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. तलाठी नरेंद्र ठाकरे यास रंगेहाथ पकडून अटक केली. ही कारवाई एसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड, पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलिस नाईक राजेश पद्मगिरवार, श्रीनिवास संगोजी, संदीप उडाण, संदीप घोरमोडे, हवालदार तुळशीराम नवघरे आदींनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: जवखेडा ठोंबरे येथे शेतकरी संवाद सभा

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT