विदर्भ

राजस्व देणारे तलाठी कार्यालये उपेक्षीतच

डिलेश्वर पंधराम

गोरेगाव (गोंदिया)-  येथील तहसील कार्यालयाअंतर्गत तीन राजस्व मंडळातील 21 सज्ज्यात 18 तलाठ्याव्दारे 99 गावातील 10 हजार खातेदारांचे जमिनीचे दस्ताऐवज आहेत. या कार्यालयाची इमारत नसल्याने मिळेल त्या ठिकाणी कार्यालये असल्याने महत्वाचे शेतकऱ्यांचे पुरावे नष्ट होण्याची भिती या खातेदारांना सतावत आहे.

राज्य शासनांनी तलाठी यांना कामे सुरळीत करता यावे म्हणुन संगणक दिले आहेत. परंतु, हे संगणक नादुरुस्त पडलेले आहेत. स्वतःची कार्यालये नसल्याने पळवित, समाजमंदीर, खाजगी भाड्याच्या खोलीत शेतकऱ्यांचे 7/12, नमुना 8अ, जमिनीचे फेरफार, व इतर दाखले देण्याचे काम व शासकीय कामे या  तलाठ्यांना करावा लागतो त्यामुळे पावसाळ्यात हे दस्ताऐवज पाण्यापासुन जपुन ठेवता येत नाही तलाठी यांच्या कामाची दखल शासनांनी घेत नवीन तलाठी पद भरती, नवीन साझे निर्माण करण्याचे ठरविले होते त्याअनुषंगाने नवीन 6 साझे, हिरडामाली, चिचगाव, बोळुंदा, तेढा, मोहगाव तिल्ली, तुमसरचे नाव घोषीत केले पण तलाठी पद भऱती झाली नाही तलाठी यांना सुरळीत कारभार करता यावा म्हणुन शासनाच्या निदर्शनात आणण्याची कामे तलाठी करीत आहेत दिवसेंदिवस कामाचा ओझे निर्माण होत आहे. 

साझे जास्त व तलाठी पद भरती कमी असल्याने एका तलाठ्याला अतीरिक्त भार पडत आहे जी तलाठी कार्यालये राजस्व उपलब्ध करवुन देतात त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे शासनांनी तलाठी पद भरती करावी, नवीन तलाठी कार्यालये इमारत देवुन शेतकऱ्यांचे महत्वाचे दस्ताऐवज सांभाळण्यास सहकार्य करावे असी मागणी होत आहे

खातेदार, शासकीय नवीन कामाचा बोझा तलाठ्यावर निर्माण झालेला असुन इमारत व सुविधा उपलब्ध नसल्याने काम करणे कठीण जात आहे- बी. एस. ठाकुर तलाठी साझा क्रमांक 10.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT